Bengaluru Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : मी आत्महत्या करणार, मला जगायचं नाही...; पत्नीची हत्या केल्यानंतर राकेशचं रडगाणं, वडिलांशी फोनवर काय काय बोलला?

Bengaluru Crime News : राकेश खेडेकर या व्यक्तीने रागाच्या भरात त्याच्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर राकेश तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि एका सुटकेसमध्ये भरुन ठेवले. त्याने वडिलांकडे हत्येची कबुली दिली.

Yash Shirke

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून हत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहे. वैवाहिक जीवनामध्ये वाद झाल्याने भांडणाचे रुपांतर हत्येमध्ये झाल्याच्या घटना घडत आहेत. मेरठमध्ये एका महिलेने तिच्या नवऱ्याची हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे ड्रममध्ये भरले. अशीच एक धक्कादायक घटना बेंगळुरूमध्ये ही घडली. राकेश खेडेकर नावाच्या व्यक्तीने त्याच्या पत्नीचा खून केला आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे सुटकेसमध्ये भरले. हत्या केल्यानंतर आरोपीने घरच्यांसमोर गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपी राकेश खेडेकरचे वडील राजेंद्र खेडेकर यांनी या घटनेवर पोलिसांसमोर जबाब दिला. ते म्हणाले, 'हत्या केल्यानंतर रात्री बारा वाजता राकेश बंगळुरूवरुन निघाला. दुसऱ्या दिवशी दुपारी त्याने मला कॉल केला आणि गुन्ह्याची कबुली दिली. मीही आत्महत्या करणार, मला जगायचं नाही असे तो म्हणत होता. मी त्याला तसं करु नको म्हटले, तू इकडे ये आपण पोलीस ठाण्यात जाऊ असे सांगितले. त्यावर तो ठीक आहे म्हणाला.'

राकेशने गौरीला मारहाण केल्याचे राजेंद्र खेडेकर यांनी पोलिसांना सांगितले. 'माझ्या मुलाने मला फोन केला होता, गौरी माझ्याबरोबर वाद घालत होती म्हणून मी तिला मारले आहे. असे त्याने फोनवरुन सांगितले. ही माहिती चार दिवसांपूर्वी राकेशने गौरीच्या आईला देखील दिली होती. मुलीच्या आईने तिला समजावून सांगितले होते' अशी माहिती राजेंद्र यांनी दिली.

राकेश खेडेकर आणि गौरी सांबेकर हे दोघे लग्नाच्या दोन वर्षांनंतर बेंगळुरूला शिफ्ट झाले होते. त्यांच्यात सतत वाद होत असे. त्यांच्यातील वाद इतका वाढला होता की, प्रत्यक्ष पोलिसांनी मध्यस्थी करत समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यातील वाद वाढत गेला आणि रागाच्या भरात राकेशने पत्नी गौरीवर धारदार चाकूने वार केले. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन एका सुटकेसमध्ये भरुन ठेवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smartphone battery life: मोबाइलची बॅटरी किती टक्के झाल्यावर चार्जिंगला लावावी?

Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय! सर्व विभागांच्या खर्चात २० टक्के कपातीचे निर्देश

Curry Leaves Water Benefits: सकाळी रिकाम्या पोटी प्या कढीपत्त्याचे पाणी; होतील 'हे' भन्नाट फायदे

EPFO Update: नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000! हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT