Crime News x
क्राईम

Crime : भिंतीवर डोकं आपटून २ वर्षांच्या मुलाला संपवलं, नंतर नराधम बापानं स्वत:वर चालवली कुऱ्हाड

Crime News : रागाच्या भरात एकाने त्याच्या २ वर्षीय मुलाचा जीव घेतला. त्याने मुलाचे डोके भिंतीवर आपटून मुलाची हत्या केली. यानंतर आरोपीने स्वत:वर कुऱ्हाडीने वार केले.

Yash Shirke

  • एका व्यक्तीने रागाच्या भरात दोन वर्षीय मुलाचा भिंतीवर डोके आपटून खून केला.

  • मुलाची हत्या केल्यानंतर शाजिदने स्वतःवर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी झाले.

  • घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Shocking : एका व्यक्तीने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडत पोटाच्या मुलाची निर्घण हत्या केली. आरोपीने आपल्या दोन वर्षांच्या मुलाचे डोके भिंतीवर आपटून त्याचा जीव घेतला. मुलाची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वत:वरही कुऱ्हाडीने स्वत:वर वार केले. ही धक्कादायक घटना राजस्थानच्या खैरथल-तिजारा जिल्ह्यातील तिजारा शहरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव शाजिद असे आहे. मृत्यू झालेल्या दोन वर्षीय मुलाचे नाव अरहान असे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी दोन वर्षीय मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि त्यानंतर लगेच तपास सुरु केला. त्यानंतर एफएसएल टीमलाही पाचारण करण्यात आले.

शाजिदने त्याच्या दोन वर्षीय मुलाला एका खोलीत बंद केले आणि त्याचे डोके भिंतीवर वारंवार आपटून निर्घृणपणे त्याची हत्या केली. पोटाच्या मुलाची हत्या केल्यानंतर शाजिदने स्वत:वर कुऱ्हाडीने वार केले आणि स्वत:ला जखमी केले. पोलिसांनी शाजिदला रुग्णालयात दाखल केले आहे. प्रकृती गंभीर असल्याने शाजिदला जयपूरला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

आरोपी शाजिदने त्याच्या मुलाची हत्या का केली? या प्रश्नाचे उत्तर अद्याप अस्पष्ट आहे. शाजिदची प्रकृती सामान्य झाल्यानंतरच त्याची चौकशी करता येईल असे पोलिसांनी म्हटले आहे. शाजिद हा तापट स्वभावाचा आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याने एका किरकोळ कारणावरून एका व्यक्तीला गंभीररित्या जखमी केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यातील देवस्थानांनी पूरग्रस्तांना मदत करावी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांची मागणी

Anganwadi Teacher: अंगणवाडी शिक्षिका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी! सेवासमाप्तीची वयोमर्यादा वाढली

Face Care: तुमच्या त्वचेसाठी कोणता फेस वॉश चांगला नाही, एकदा जाणून घ्या

Nashik Shocking : मैत्रिणीसह फोटोग्राफर तरुणीला हॉटेलमध्ये डांबलं; शरीरसुखाची मागणी केली, पिस्तुलाचा धाक दाखवला अन्...

Hair Spray For Hair Growth: दुप्पट वेगाने वाढतील केस, हा घरगुती हेअर स्पे एकदा नक्की वापरुन पाहा

SCROLL FOR NEXT