school classroom x
क्राईम

Crime : शाळेत गोळीबाराचा थरार! कानाखाली मारल्याचा राग, विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी

Crime News : कानशिलात लगावल्याच्या रागात एका विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकावर गोळी झाडली. या विद्यार्थ्याने जेवणाच्या डब्यामध्ये पिस्तूल लपवून आणल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

Shocking : एका खासगी शाळेत नववीच्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकावर गोळी झाडली. हा विद्यार्थ्याने त्याच्या दप्तरामध्ये लपवून पिस्तूल आणले होते. शिक्षकाच्या उजव्या खांद्याखाली गोळी लागली असल्याचे म्हटले जात आहे. गोळी लागल्यानंतर शिक्षकाला गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना उत्तराखंडमधील उधम सिंहनदर येथील काशीपूरमध्ये घडली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकाने विद्यार्थ्याला कानशिलात लगावली होती. सर्वांसमोर कानशिलात मारल्याचा राग विद्यार्थ्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्याने रागाच्या भरात त्याच्या जेवणाच्या डब्यात लपवून शाळेत पिस्तूल आणले. वर्ग सुरु असताना त्याने शिक्षकावर गोळी झाडली.

गोळी झाडल्यानंतर विद्यार्थ्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण शिक्षकांनी त्याला पकडले. शाळेतील शिक्षकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी जखमी शिक्षकाला खासगी रुग्णालयात दाखल केले. शिक्षकाच्या तक्रारीनंतर अल्पवयीन आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकाला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे, असे एएसपी अभय सिंग यांनी म्हटले आहे.

काल (२० ऑगस्ट) शिक्षक गगनदीप कोहली हे सकाळी ९.४५ वाजता काशीपूरमधील कुंडेश्वरी रोडवरील खासगी शाळेत भौतिकशास्त्राचा तास घेण्यासाठी पोहोचले होते. तास संपल्यानंतर वर्गातून बाहेर पडण्याच्या तयारीत असताना एका विद्यार्थ्याने जेवणाच्या डब्यातून पिस्तूल काढले आणि कोहली यांच्यावर गोळी झाडली, कोहली यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lion Video Viral: महाराष्ट्रातील पुरात अडकला सिंह? जीव वाचवण्यासाठी सिंहाची धडपड

POCSO : अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, पोक्सो न्यायालयाने महिलेला सुनावली २० वर्षांची शिक्षा

Palghar: तारापूर MIDC मधील कंपनीत वायू गळती, ४ कामगारांचा मृत्यू; चौघांची प्रकृती चिंताजनक

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाच्या विसर्गात आणखी मोठी वाढ

Ladki Bahin Yojana: १२ हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांकडून 'लाडकी'चा लाभ, शिस्तभंगाची कारवाई होणार|VIDEO

SCROLL FOR NEXT