Andhra pradesh Crime Saam Tv
क्राईम

Crime: भयंकर! दहावीच्या विद्यार्थिनीवर १४ जणांकडून बलात्कार, पीडिता ८ महिन्यांची गर्भवती

Andhra pradesh Crime: आंध्र प्रदेशमध्ये दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर १४ जणांनी बलात्कार केला. मुलगी ८ गर्भवती राहिली. या प्रकरणी १७ जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे.

Priya More

आंध्र प्रदेशमध्ये दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर १४ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून आरोपी वारंवार या मुलीवर बलात्कार करत होते. मुलगी ८ महिन्यांची गरदोर राहिली आहे. या घटनेमुळे आंध्र प्रदेशमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींनी अटक केली आहे. आरोपींमध्ये अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशात बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका १५ वर्षांच्या मुलीवर १४ जणांनी दोन वर्षांपासून सतत बलात्कार केला. ही मुलगी आठवीमध्ये शिकत होती तेव्हापासून आरोपी तिच्यावर बलात्कार करत होते. ती आठ महिन्यांची गरोदर राहिली आहे. सध्या मुलगी दहावीला गेली. पण गरोदर असल्यामुळे ती शाळेत जात नाही.

जिल्हा एसपी रत्ना सिंह यांनी सांगितले की, पीडित मुलगी आठवीमध्ये शिकत असल्यापासून तिच्यावर अत्याचार सुरू झाले होते. आता ही मुलगी दहावीमध्ये गेली. दहावीत शिकणारी मुलगी एप्रिलपर्यंत शाळेत येत होती. ही मुलगी आता आठ महिन्यांची गर्भवती आहे आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलासह १७ आरोपींना अटक करण्यात आली. तिघांनी आरोपींना आश्रय दिला होता त्यामुळे त्यांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

जिल्हा एसपींनी पुढे असे देखील सांगितले की, 'आरोपींनी मुलीला धमकावले आणि ब्लॅकमेल केले. पीडित मुलगी अनुसूचित जातीमधील आहे आणि तिच्या एकट्या आईसोबत राहत होती. मुलगी एकटी असल्याचा फायदा आरोपींनी घेतला आणि ते तिच्यावर सतत बलात्कार करत राहिले. कुणाला सांगू नये यासाठी ते या मुलीला सतत धमकावत राहिले. त्यामुळे हे प्रकरण बाहेर येण्यास उशिर झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT