आंध्रप्रदेशमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांची बहिण शर्मिला रेड्डी कॉंग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंध्र प्रदेशचे प्रभारी मैनिकम टैगोर हे शर्मिला रेड्डी यांचा पक्ष वाईएसआर तेलंगाना पार्टी कॉंग्रेसमध्ये विलीन करण्याच्या प्रयत्नात आहेत.
विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांची आई मुलीच्या बाजूने आहे. जगनमोहन रेड्डी कारागृहात असताना पक्षाची कमान सांभाळण्याचं काम शर्मिला रेड्डी यांनी केलं होतं. त्यामुळे शर्मिला रेड्डी यांना सोबत घेत कॉंग्रेस दक्षिणेत आपले लक्ष केंद्रीत करत असल्याचं दिसून येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शर्मिला पक्षात सामील झाल्या तर दक्षिणेत तेलंगणा नंतर आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसची ताकद वाढू शकते. काही दिवसांपूर्वी शर्मिला रेड्डी यांनी सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. लवकरच त्या राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. (Latest Marathi News)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांड शर्मिला यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तसेच आंध्र प्रदेशातही महत्त्वाची भूमिका देणार आहे. काँग्रेस पक्षात त्यांना सरचिटणीसपद दिले जाण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेशात या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्याआधी बहिणीचा हा निर्णय जगन मोहन रेड्डी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतर अवघ्या महिन्याभरातच हा निर्णय घेण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.