Crime x
क्राईम

Crime : मंदिरात लग्न, मग गर्भपात... महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?

Crime News : एका २४ वर्षीय महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी महिलेच्या डॉक्टर प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

Yash Shirke

  • कोलकात्यातील २४ वर्षीय महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाला.

  • मृत डॉक्टरच्या प्रियकर असलेल्या ज्युनियर डॉक्टरला पोलिसांनी अटक केली.

  • मंदिरात लग्न, गर्भपात आणि जबरदस्तीचे आरोप; प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Shocking : २४ वर्षीय महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर एका ज्युनियर डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. हा ज्युनियर डॉक्टर मृत महिला डॉक्टरचा प्रियकर असल्याचे म्हटले जात आहे. ही महिला डॉक्टर तिच्या प्रियकराला भेटायला गेली होती. तिच्या मृत्यूमध्ये प्रियकराचा हात असल्याचे कुटुंबाने म्हटले आहे. तिने प्रियकरासोबत मंदिरात लग्न केल्याचेही महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. ही घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला डॉक्टर ही कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज, हॉस्पिटलची विद्यार्थिनी होती. तिच्या मृत्यूप्रकरणी तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. तिचा प्रियकर सरकारी मालदा मेडिकल कॉलेज, हॉस्पिटलमधील ज्युनियर डॉक्टर आहे. 'ज्युनियर डॉक्टरशी संबंध असताना माझी मुलगी गर्भवती राहिली होती. त्यानंतर तिने गर्भपात केला. मुलीने मंदिरात लग्न केले होते. पण जेव्हा माझ्या मुलीने न्यायालयात लग्न करण्याचा आग्रह केला तेव्हा आरोपीने दुर्लक्ष केले', असा आरोेप मृत महिला डॉक्टरच्या आईने केले आहेत.

आरोपी ज्युनियर डॉक्टर हा मूळचा बंगालमधील पुरुलिया जिल्ह्याचा रहिवासी आहे. मृत महिलेच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या फोन लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. महिला डॉक्टरचा मृत्यू ड्रग्सच्या अतिसेवनामुळे झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

मृत महिला डॉक्टरच्या आईने आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली आहे. 'तीन महिन्यांपूर्वी त्या दोघांनी मंदिरात लग्न केले होते. पण तो (आरोपी) न्यायालयात जाऊन लग्न करायला तयार नव्हता. माझ्या मुलीने मला तिच्या गर्भपाताबद्दल सांगितले होते. तिला जबरदस्तीने काहीतरी खायला दिले असल्याची शक्यता आहे. आम्ही रुग्णालयात पोहोचलो तेव्हा माझ्या मुलीच्या तोंडातून फेस येत होता', असे महिला डॉक्टरच्या आईने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT