chiplun police arrests bhondubaba along with the two  Saam Digital
क्राईम

साध्या भोळ्या कोकणी माणसांना फसविणा-या जळगावमधील भोंदूबाबाला चिपळूणमध्ये अटक

chiplun police arrests bhondubaba along with the two : रत्नागिरी जिल्ह्यात भाेंदूबाबाने जाहिरातीच्या माध्यमातून प्रसार सुरु हाेता. त्याच्या जाहिरातींना अनेक जण भूलले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमोल कलये

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात जादूटोणा करणाऱ्या एका बाबाला चिपळूण पाेलिसांनी आज (गुरुवार) अटक केली. पाेलिसांनी बाबा राहत असलेल्या फ्लॅटमधून जादुटोणा करण्याचे सर्व साहित्य जप्त केले. हा बाबा जळगाव मधील असल्याची माहिती पाेलिसांनी साम टीव्हीला दिली.

चिपळूण शहरातील एका अलिशान फ्लॅटमध्ये बाबा त्याचा दरबार चालवत असे. एका जागृत महिलांने पाेलिसांकडे बाबाची तक्रार केली. त्यानंतर पाेलिसांनी आज ही धाडसी कारवाई केली. बाबाच्या फ्लॅटवर पाेलिसांनी धाड टाकली.

या फ्लॅटमधील बाबाच्या रूमम मध्ये पाेलिसांना मद्याच्या बोटल सापडल्या. पाेलिसांनी त्याला काही प्रश्न केले. त्यावेळी त्याची भांबेरी उडाली. अधिक चाैकशीनंतर पाेलिसांनी बाबाला ताब्यात घेतले. त्याच्याकडील जादुटोणा करण्याचे सर्व साहित्य जप्त केले. या प्रकरणी पाेलिसांनी बाबासह एकाला ताब्यात घेतले असून अन्य दाेघांचा तपास सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT