Haryana CM Flying Squad Saam Tv News
क्राईम

मुख्यमंत्र्यांच्या 'Flying Squad'चा जुगार अड्ड्यावर छापा! ५५ गॅम्बलरला अटक; १२ लाख रोकड, ४६ मोबाईल अन् डझनभर गाड्या जप्त

Haryana CM Flying Squad : हरियाणामधील करनाल येथील घरौंडामध्ये दुर्गा कॉलनीत मुख्यमंत्र्यांच्या फ्लाइंग नावाच्या पथकाने छापा टाकून ५३ जणांना जुगार खेळताना पकडलं. त्यांच्याकडून १२ लाखांहून अधिक रुपये जप्त करण्यात आले.

Prashant Patil

करनाल : हरियाणामधील करनाल येथील घरौंडामध्ये दुर्गा कॉलनीत मुख्यमंत्र्यांच्या फ्लाइंग नावाच्या पथकाने छापा टाकून ५३ जणांना जुगार खेळताना पकडलं. त्यांच्याकडून १२ लाखांहून अधिक रुपये जप्त करण्यात आले, तर ४० हून अधिक फोन जप्त करण्यात आले. यातील बहुतेक लोक वाहनांमधून आले होते, त्यामुळे १२ वाहनांच्या चाव्याही सापडल्या. यासोबतच कार्ड, नाणी आणि डिस्कही जप्त करण्यात आल्या. अटक करण्यात आलेले हे लोक वेगवेगळ्या जिल्ह्यातील होते जे येथे येऊन जुगार खेळत असत. पथकाचे डीएसपी सुशील कुमार यांनी सांगितलं की, त्यांना माहिती मिळाली होती की रिंकू कश्यप नावाची व्यक्ती घरौंडा येथील निवासी भागातील एका घरात सट्टेबाजीचा व्यवसाय करत आहे.

डीएसपी यांनी पुढे सांगितलं की, 'येथे एक व्यक्ती आहे ज्याच्या संरक्षणाखाली जुगार खेळला जात होता आणि तो व्यक्ती त्यांच्याकडून दररोज ५० हजार रुपये घेत असे जेणेकरून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये, आता सीएम फ्लाइंगची टीम त्यालाही पकडण्याचा प्रयत्न करत आहे. आज या ५३ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सीएम फ्लाइंगचे हे मोठं यश आहे. ज्यामध्ये सीआयडी आणि घरौंडा पोलिसांनीही भूमिका बजावली. हे सर्व जण घराच्या आत एका खोलीत बसून जुगार खेळत असत आणि आता त्यांना पकडण्यात आलं आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही येथे करण्यात आली होती. सध्या सीएम फ्लाइंग आणि घरौंडा पोलीस तपास करत आहेत. सर्व ५३ आरोपींविरुद्ध जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

Body Sugar Level: रोज गोड खल्याने शरिरात शुगरचे प्रमाण किती वाढते?

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गामुळे वारंवार पूर येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Maharashtra Politics: हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच खडसेंनी पत्रकार परिषदेतच महाजनांचा तो व्हिडिओ लावला | VIDEO

SCROLL FOR NEXT