Chhatrapati Sambhajinagar Shiv Sena MLA Ramesh Bornare Saam Tv News
क्राईम

Ramesh Bornare : तू खूप दिवसांपासून डोक्यात आहेस; शिंदेंचे आमदार रमेश बोरनारेंची भाजप कार्यकर्त्याला मारहाण; पोलिसही तक्रार घेईना

MLA Ramesh Bornare Beaten BJP Worker : छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्याच्या कामावरुन वाद झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी आपल्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्याने केला आहे.

Prashant Patil

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्याच्या कामावरुन वाद झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी आपल्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्याने केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात ३ तास बसूनही तक्रार दाखल केली जात नसल्याचंही त्या भाजपच्या कार्यकर्त्याने म्हटलं आहे. कैलास पवार असं या भाजपच्या कार्यकर्त्याचं नाव आहे.

कैलास पवार यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे, त्यांच्या राहत्या घरासमोर रस्त्याचं काम सुरू आहे. तेव्हा पवार हे प्लॉटवर गेले असता तेथे रमेश बोरनारे यांच्यासह काही कार्यकर्ते हे अगोदरच उपस्थित होते. यावेळी नगर पालिकेचे इंजिनिअर देखील उपस्थित होते. आमदार बोरनारे यांनी प्लॉट नंबर ४८ मधून रस्ता करा असं ठेकेदाराला सांगितलं. यानंतर पवार यांनी इंजिनिअर यांना रस्ता करण्यापूर्वी एन ए लेआऊट बघून घ्या असं सांगितलं. यावर आमदार बोरनारे यांनी शिवीगाळ केली. 'तुझा जुना हिशोब चुकता करायचा आहे, तुला इथे राहू देणार नाही', असं म्हणत कार्यकर्त्यांसह मारहाण केली अशी लेखी तक्रार कैलास पवार यांनी दिली. आमदार बोरनारे यांनी पोलिसांवर दबाव आणला असून त्यामुळे पोलीसही आपली तक्रार दाखल करुन घेत नसल्याचं कैलास पवार म्हणाले.

कैलास पवार म्हणाले की, 'आपल्या बंगल्याशेजारी रस्त्याचं काम सुरू होतं. त्या ठिकाणी आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते होते. रविवारी सुट्टी असूनही नगरपरिषदेचे अधिकारी त्या ठिकाणी आले होते. त्यावेळी आमदारांनी प्लॉट नंबर ४८ मधून रस्ता काढण्याचे आदेश इंजिनिअरला दिले. त्यावर आपण इंजिनिअरला ले आऊट बघायला सांगितलं. त्या ले आऊटमध्ये रस्ता नाही. त्यावर आमदार चिडले आणि त्यांनी मला धमकी दिली. 'तू खूप दिवसांपासून आमच्या डोक्यात आहेस. तुझी फॅमिली संपवायची आहे', असं सांगत त्यांनी मला मारहाण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Atal Setu : आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास, 'अटल सेतू'मुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

Digestion Tips: पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी नक्की करा 'हे' उपाय

Bhagavad Gita: भगवद्गीतेचा सहावा अध्याय कोणती शिकवण देतो?

Ahmedabad Student Death: आदल्या दिवशी १०वीच्या मुलीने 'सैयारा' पाहिला; दुसऱ्या दिवशी शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली

Maharashtra Live News Update: पुढच्या पिढीला माहिती होण्यासाठी कारगिल दिन साजरा केला पाहिजे

SCROLL FOR NEXT