Physically Abused Minor Girl: Saam Tv
क्राईम

Chhatrapati Sambhajinagar: धक्कादायक! घरातून रूसून गेली अन् दोघांच्या तावडीत सापडली; मदतीचं आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Physically Abused Minor Girl: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Rohini Gudaghe

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये मदतीच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी पिडीतेला बारा दिवस शहरातल्या वेगवेगळ्या लॉजवर फिरवल्याचं देखील समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये या धक्कादायक घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, किरकोळ कारणावरून पीडित मुलीचं आई वडिलांसोबत भांडण झालं होतं. त्यामुळे ती रूसून घराबाहेर गेली होती. पीडितेचं वय १४ वर्षे आणि ९ महिने असल्याची माहिती मिळत (crime news) आहे. यावेळी पीडित मुलगी आई वडील रागावल्यामुळे घरातून रुसून गेली होती. ती मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर जाऊन रडत बसली. आरोपी हा मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर पाणी विक्रीचे काम करतो.

मदतीच्या बहाण्याने आरोपीने पीडितेशी जवळीक साधली. मदतीचा बहाणा करून तिच्याशी बोलायला सुरुवात केली. इतकच नव्हे तर स्वतःचा मोबाईल क्रमांकही दिला. काही मदत लागली तर फोन करण्यास सांगितले. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी हा लॉजवर काम करत होता. या दोघांनी पीडित अल्पवयीन तरुणीला शहरातल्या वेगवेगळ्या लॉजवर कुठलेही रेकॉर्ड न ठेवता बारा दिवस (Chhatrapati Sambhajinagar Crime News) फिरविले.

हे प्रकरण उघडकीस येताच पुंडलिक नगर पोलिसांनी आरोपींनी बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार (Physically Abused Minor Girl) केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान प्रकरणी न्यायालयाने या दोघांनाही ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या दोन नराधमांनी पीडितेला मदत करण्याचं आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT