Walunj Crime Businessman Shot Dead Case: Saamtv
क्राईम

Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नीशी अनैतिक संबंधांचा संशय, पोलिसानेच व्यापाऱ्याला गोळी झाडून संपवले; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Walunj Crime Businessman Shot Dead: ७ मार्च रोजी वाळुज एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत व्यापारी सचिन नरोडे याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत होते.

Gangappa Pujari

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. २२ मार्च २०२४

Chhatrapati Sambhajinagar Crime:

छत्रपती संभाजीनगरच्या वाळुजमध्ये चार दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याचा खून झाला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या संपूर्ण हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले असून पोलिसानेच व्यापाऱ्याला गोळी झाडून संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Crime News in Marathi)

काय आहे प्रकरण?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, १७ मार्च रोजी वाळुज एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत व्यापारी सचिन नरोडे याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत होते. या तपासात आता धक्कादायक माहिती समोर आली असून अनैतिक संबंधांच्या संशयातून पोलीस हेडकॉन्स्टेबलनेच ही हत्या केल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर काळे याला व्यापारी सचिन नरोडे याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून त्याने ही हत्या करण्याचा कट रचला. मागील अनेक दिवसांपासून व्यापारी सचिन नरोडे यांच्या मागावर आरोपी रामेश्वर काळे होता. घटनेच्या दिवशी रविवारी रात्री साजापूर परिसरातील वीज गेली होती. त्याच अंधाराचा फायदा घेत आरोपीने कपाळावर गोळी झाडून व्यापाऱ्याला संपवले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, या प्रकरणी ग्रामीण दलात कार्यरत असलेला हेड-कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यांच्यासोबत अजून एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे हा हेडकॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका कारवाईत निलंबित होता. त्याच्यावर 354 प्रमाणे देखील गुन्हा दाखल आहे. या धक्कादायक घटनेची सध्या परिपरात चांगलीच चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

Crime News: नवऱ्याला चारित्र्याचा संशय; वाट अडवून भररस्त्यात बायकोसोबत केलं भयानक कृत्य

Nilesh Ghaywal illegal property : घायवळच्या घरावर पोलिसांची धाड, कोण आहे घायवळचा आका? VIDEO

'आनंदाचा शिधा' बंद होणार? लाडकी बहिण योजनेचा फटका

Two Group Clash : भाजप मंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान मोठा राडा; कार्यकर्ते आपापसात भिडले, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT