Anna Hajare News: ...पण त्यांच्या डोक्यात बसलं नाही, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

Anna Hajare Reaction On Arvind Kejriwal Arrest: केजरीवाल यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच अरविंद केजरीवाल यांचे जुने सहकारी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या कारवाईवर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
Anna Hajare Reaction On Arvind Kejriwal Arrest
Anna Hajare Reaction On Arvind Kejriwal ArrestSaamtv
Published On

सुशिल थोरात, अहमदनगर|ता. २२ मार्च २०२४

Anna Hajare Reaction On Arvind Kejriwal:

कथित मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी (ता. २१) ईडीने अटक केली. दिल्ली उच्च न्यायालायने त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर ईडीने तात्काळ त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. केजरीवाल यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच अरविंद केजरीवाल यांचे जुने सहकारी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या कारवाईवर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अण्णा हजारे?

"मी मद्यधोरणावर अनेक वेळा पत्रे लिहिली. माझा पत्र लिहिण्याचा उद्देश एकच होता. आज दारूमुळे महिलांवर अन्याय होतात, अत्याचार होतात, त्याला आळा बसला पाहिजे. दारूमुळे हत्यादेखील होतात त्याला आळा बसला पाहिजे. ही दारूची नीती संपवली पाहिजे,' परंतु हे केजरीवाल यांच्या डोक्यात बसलं नाही आणि त्यांनी दारूची नीती केली. शेवटी त्या दारू नितीमुळेच त्याला अटक झाली. त्यामुळे आता ते आणि सरकार बघून घेतील ज्यांची चूक झाली त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे," असे अण्णा हजारे म्हणालेत.

संजय राऊतांचा खोचक सवाल..

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर संजय राऊतांनी अण्णा हजारेंवर निशाणा साधला होता. "अण्णा हजारे यांना पहिले जागे करा ,कुठे आहेत ते? मला माहीत नाही. कुठे असतात ते? एकेकाळी अशा विषयांवर त्यांचे आंदोलन होते. आता कुठे हरवले आहेत ते मला माहिती नाही," असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.

Anna Hajare Reaction On Arvind Kejriwal Arrest
Lok Sabha Election 2024 : नंदुरबार लोकसभेसाठी काँग्रेसचे गोवाल पाडवी; भाजप खासदार डॉ. हिना गावित यांच्याशी लढत

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही केंद्र सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Anna Hajare Reaction On Arvind Kejriwal Arrest
World Water Day : पाणी वाचवा! मालेगावमध्ये जलवाहिनी फुटली, रस्त्याला नदीचे स्वरुप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com