Chhatrapati Sambhajinagar Water Crisis 
क्राईम

Chhatrapati Sambhajinagar Crime: लॉजमध्ये थरार! डॉक्टर प्रेयसीच्या गळ्यावर वार, प्रियकराचाही आत्महत्येचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

Chhatrapati Sambhajinagar Breaking News: या भयंकर घटनेने शहरात खळबळ उडाली असून याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

सर्जिकल ब्लेडने डॉक्टर प्रेयसीच्या गळ्यावर वार करत प्रियकरानेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. या भयंकर घटनेने शहरात खळबळ उडाली असून याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असलेल्या प्रेयसीच्या गळ्यावर तेथेच टेक्निशियन म्हणून असलेल्या प्रियकराने सर्जिकल ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका लॉजमध्ये घडली.

समोर आलेल्या माहितीनुसार, डॉक्टर तरुणी ही ईश्वरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये आर एम ओ आहे तर आरोपी निखिल दादाराव यादव हासुद्धा तिथेच टेक्निशियन म्हणून काम करत होता. हे दोघेही जुलै 2023 पासून एकमेकांना ओळखत होते आणि जानेवारी 2024 पासून त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.

काल दोघेही शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात एका लॉजमध्ये गेले असता निखिल यादव याने सर्जिकल ब्लेडने डॉक्टर प्रेयसीच्या गळ्यावर वार केले. त्याबरोबरच त्यांनी स्वतःही गळ्यावर वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र आरडाओरडा केल्यानंतर त्याने त्या ठिकाणाहून पळ काढला. त्याच्याविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Train Accident : अंगावर काटा आणणारा रेल्वे अपघात! पेसेंजर ट्रेन थेट मालगाडीवर चढली, लोको पायलटसह ११ प्रवाशांचा मृत्यू

Election commission : निवडणुकीची घोषणा, याद्यांचा घोळ कायम; पत्रकारांच्या प्रश्नांवर आयोगाची भंबेरी, VIDEO

Mumbai : मुंबईत मानवतेला काळिमा! १ महिन्याचे बालक कचऱ्यात फेकले; समाजाला हादरवणारी घटना

Neral Matheran Train : शिट्टीचा आवाज घुमणार! माथेरानला बिंदास्त फिरायला जा, ‘हिल क्वीन’ गुरूवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT