Maharashtra Politics: शिर्डीत महाविकास आघाडीला मोठा धक्का! उत्कर्षा रुपवतेंचा कॉंग्रेसला रामराम, वंचितकडून लढणार?

Utkarsha Rupwate Join Vanchit Bahujan Aghadi: ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आहे.
Utkarsha Rupwate
Utkarsha RupwateSaam Tv

अक्षय गवळी साम टीव्ही प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश (Utkarsha Rupwate Join Vanchit Bahujan Aghadi) घेतला. अकोल्यातल्या कृषी नगर भागातील आंबेडकरांच्या यवशंत भवन निवासस्थानी त्यांचा प्रवेश झाला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला (Maharashtra Election) आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते ((Utkarsha Rupwate) यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे हे उपस्थित होते. उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसची साथ सोडल्यामुळे उडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Maharashtra Politics) महाविकास आघडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या उत्कर्षा रूपवते यांचा काँग्रेसच्या सदस्य पदाचा आणि राज्य महासचिव पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश ( Vanchit Bahujan Aghadi) केला आहे. अकोला येथे प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत १७ एप्रिल रेजी रात्री हा पक्ष प्रवेश पार पडला.

महाविकास आघाडीत शिर्डीची जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी रूपवते आग्रही होत्या. मात्र, शिर्डीची जागा ठाकरे गटाकडे कायम राहिल्याने रूपवते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं (Shirdi Lok Sabha Constituency) होतं. उत्कर्षा रुपवते राज्य महिला आयोगाच्या सदस्या आहेत. रूपवते बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय असल्याचं मानल जातं.

Utkarsha Rupwate
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 102 जागांवर प्रचार संपला, महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये 19 एप्रिलला मतदान

काँग्रेसकडून वारंवार लोकसभेची (Lok Sabha 2024) उमेदवारी नाकारली जात असल्याने निराशेची भावना त्यांच्या मनामधून होती. अखेर उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. आता उत्कर्षा रूपवते वंचितकडून शिर्डी लोकसभेची उमेदवारी करण्याची शक्यता (Lok Sabha) वर्तविली जात आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याचं चित्र आहे.

Utkarsha Rupwate
Maharashatra Election: धाराशिवमध्ये दीरविरुद्ध भावजयचा सामना; मात्र दोन्हांची उमेदवारी अडचणीत, काय आहे कारण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com