Chandrapur Crime News Saam Digital
क्राईम

Chandrapur Crime News: पेट्रोल पंप लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या तेलंगणा सीमेवर आवळल्या मुसक्या, बारा तासांत दरोड्याचा छडा

Chandrapur Crime News Update: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा -वरुर मार्गावरील साईकृपा पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांना पाच बुरखाधारी तरुणांनी बंदूक व कोयत्याचा धाक दाखवून दोन लाख रुपये लुटले होते.

Sandeep Gawade

Chandrapur Crime News

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा -वरुर मार्गावरील साईकृपा पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांना पाच बुरखाधारी तरुणांनी बंदूक व कोयत्याचा धाक दाखवून दोन लाख रुपये लुटले होते. या धाडसी दरोड्यानंतर पोलिसांनी अनेक तपास पथकं तयार करून नाकाबंदी केली. सीसीटीव्हीमध्ये कैद आरोपींबाबत राजुरा उपविभागात जोरदार तपासचक्रे चालवल्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. 

मारुती शेरकुरे (31), दीपक देवगडे (22),  नंदकिशोर देवगडे (19), महेश देवगडे (22) दत्तू काळे (20) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या बंदुका, कोयता देखील जप्त करण्यात आला आहे. अवघ्या बारा तासात तेलंगणा सीमेवरील या मोठ्या दरोड्याच्या घटनेतील आरोपींच्या मुसक्या आवळून चंद्रपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने तडफदार कारवाई केली आहे.  

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या तेलंगणा सीमेवरच्या आसिफाबाद मार्गावरच्या पेट्रोल पंपावर धाडसी दरोडा पडला होताय पिस्तुलचा धाक दाखवत दरोडेखोरांनी 2 लाखांची रोकड लुटली होती. रात्री 2 वाजता हा दरोडा पडला होता. 5 दरोडेखोरांना पंपावरील केबीनमध्ये प्रवेश केला. पिस्तुलच्या धाक दाखवत लुटण्यात आले होते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lingayat Community: 'लिंगायत जात नाही तर धर्म' धर्मावरुन नव्या वादाची ठिणगी

Lalbaugcha Raja: सामान्यांना धक्काबुक्की, सेलिब्रिटींना विशेष वागणूक; लालबागचा राजा मंडळावर टीकेची झोड

Sperm Quality: स्पर्म क्वालिटी वाढवण्यासाठी खा 'या' गोष्टी

Actress : त्याने स्पर्श केला अन्... प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत चित्रपटाच्या सेटवर गैरवर्तन, स्वत: सांगितली आपबिती

Cancer Vaccine: जग कॅन्सरमुक्त होणार? कॅन्सर रुग्णांसाठी मोठी खूशखबर

SCROLL FOR NEXT