chandrapur city police arrests youth released young girl of west bengal  Saam Digital
क्राईम

Tours & Travels च्या हनीमून पॅकेजच्या नावाखाली फ्लॅटमध्ये सुरु हाेतं भलतंच, चंद्रपूरात युवकास अटक

Chandrapur City Police Arrests Youth : शहरातील मध्यवस्तीत राेज नवनवीन नागरिकांचे चेहरे दिसू लागल्याने नक्की त्या अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये काय चालते याची उत्सुकता नागरिकांना देखील हाेती.

Siddharth Latkar

चंद्रपूर शहराच्या मध्यभागातील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शहर पाेलिसांनी धाड टाकली. या फ्लॅटमधून पोलिसांनी पश्चिम बंगालमधील एका युवतीची सुटका केली. तसेच प्रणय गेडाम या दलालास अटक केली आहे. अधिक तपास चंद्रपूर शहर पाेलिस करीत आहेत.

रामाळा तलाव परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये प्रणय गेडाम याने फ्लॅट भाड्याने घेतला होता. टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचा बहाणा करत हनिमून पॅकेजच्या नावावर तेथे कुंटणखाना चालवला जात होता. रोज नवनवे लोक येत असल्याने परिसरातील नागरिकांना संशय आला.

फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालत असल्याची कुणकुण अपार्टमेंटमधील नागरिकांना लागताच त्यांनी याची माहिती शहर पोलिसांना दिली. बुधवारी पोलिसांनी सुरुवातीला संशयित फ्लॅटमध्ये डमी ग्राहक पाठविला. खात्री पटल्यानंतर धाड घालून फ्लॅटमधून प्रणय गेडाम या युवकाला ताब्यात घेतले.

पश्चिम बंगालमधील युवतीची सुटका

यावेळी फ्लॅटमध्ये एक युवती आढळून आली. तिची चौकशी केली असता ती पश्चिम बंगालमधील असल्याचे तिने सांगितले. पाेलिसांनी तिची या कुंटणखान्यातून सुटका केली. प्रणय गेडाम याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केल्याची माहिती प्रभावती एकुरके (पोलिस निरीक्षक, शहर पाेलिस ठाणे) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: भरधाव कारची उभ्या ट्रकला धडक, माजी गृहमंत्र्यांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू; वाहनाचा चक्काचूर

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांचा पुन्हा एकदा सतेज पाटील यांना इशारा

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मनसेला भगदाड! बड्या नेत्याचा इंजिनला जय महाराष्ट्र, राज ठाकरेंना मोठा धक्का|VIDEO

घोटाळा झाला! लालूप्रसाद यादवांचं अख्खं कुटुंब अडचणीत; राबडी, तेजस्वी, तेजप्रताप, मीसा भारतींसह ४६ जणांवर आरोपनिश्चिती

Drinking water: तुम्हीही उभं राहून पाणी पिता? आजच बदल ही सवय; ४ आरोग्य समस्या उद्भवू शकतात

SCROLL FOR NEXT