Pune Chain Snatching 
क्राईम

Pune Chain Snatching : वडापावचा मोह पडला सोन्याच्या भावात; महिलेचं पाच लाखांचं सोनं लंपास

Pune Chain Snatching : धक्कादायक बातमी आहे पुण्यातून. एका निवृत्त शिक्षिकेनं 20 रूपयांच्या वडापावसाठी पाच लाख रुपयांचं सोनं गमावलं आहे. पुण्यातल्या हडपसर भागात ही घटना घडली आहे. नक्की काय प्रकार घडलाय पाहूया या रिपोर्टमधून.

Girish Nikam

वडापाव कोणाला आवडत नाही...अगदी चिमुरड्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण मिटक्या मारत वडापाव खातात. त्यातही प्रत्येक शहरातील वडापावची चव वेगळी. आता पुण्यातील हडपसर भागात हाच वडापावचा मोह एका वृद्ध दांम्पत्याला मोठा महागात पडलाय. अगदी सोन्याचा भावात.दचकलात ना. हो पण हे खरं आहे. निवृत्ती शिक्षिकेबाबत हा प्रकार घडलाय. त्याचं झालं असं की.

जयश्री धामणे पतीसमवेत बँक ऑफ इंडिया मध्ये तारण ठेवलेले सोन्याचे दागिने सोडण्यासाठी उऱळीकांचनच्या ब्रँचमध्ये गेल्या होत्या. स्कुटीवरुन दागिने घेऊन घरी परतताना शेवाळवाडीतील रोहीत वडेवाले यांच्या दुकानासमोर वडापाव घेण्याचा मोह जयश्रींना झाला आणि इथेच घात झाला. या दाम्पत्यावर पाळत ठेवलेल्या चोरट्यानं डाव साधला.

जयश्री स्कुटी जवळ थांबल्या होत्या. सोन्याचे दागिने असलेली बॅग स्कुटीच्या समोर अडकवलेली होती. त्याचवेळी चोरट्याने जयश्री यांचे लक्ष विचलित करण्यासाठी तुमचे पैसे पडले आहेत असं सांगितलं. आणि क्षणात दागिने असलेली बॅग लंपास केली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. चोरट्याला पकडण्याचं मोठ आव्हान पोलिसांसमोर आहे. गेल्या काही महिन्यांतील पुण्यातील गुन्ह्यांचं प्रमाण बघता पोलिसांचा धाक उरला नाही, असं चित्र आहे. वृद्ध नागरिकांना भर रस्त्यात लुटण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनीही सजग राहणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT