आरटीईमधून प्रवेश
Nagpur Crime News Saam Tv
क्राईम

Nagpur Crime News: धक्कादायक! बनावट कागदपत्रे देत आरटीईमधून प्रवेश, नागपूरमध्ये १७ पालकांवर गुन्हा दाखल

Rohini Gudaghe

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

नागपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकूण १७ पालकांनी असा गैरप्रकार केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी संबंधित पालकांवर नागपूरमधील सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरटीई अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना कमी शुल्कात प्रवेश दिला जातो. याचाच गैरफायदा नागपूरमध्ये तब्बल १७ पालकांनी घेतल्याचं समोर आलं (Aadmission Under RTE) आहे. बनावट कागदपत्रे सादर करून आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविणाऱ्या १७ पालकांवर नागपूरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही राज्यातील पहिलीच कारवाई आहे. याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

काही पालकांनी आपल्या मुलांना आरटीई योजनेचा लाभ (Nagpur Crime News) मिळावा, पैसे वाचावेत या हेतुने योजनेसाठी लागणारे बनावट कागदपत्रे तयाक केले. यातील अनेक पालकांनी खोटे उत्पन्न दाखवले तर काहींनी चुकीची रेंट ऍग्रिमेंट जोडल्याचं तपासात उघड झालं आहे. आता या १७ पालकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे . त्यांची सविस्तर चौकशी केली जात (Nagpur News) आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार म्हणजेच आरटीईनुसार खासगी शाळांमध्ये दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के आरक्षित जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यंदा हा अर्ज करण्यासाठी ३१ मे पर्यंत मुदत देण्यात आलेली (Fake Documents) आहे. अर्ज करताना पालकांनी अर्जासोबत घराचा पत्ता, जन्मदाखला आणि जात प्रमाणपत्र जोडावे लागते. अर्जामध्ये काहीही चुकीची माहिती आढळल्यास विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करता येतो. https://student.maharashtra.gov.in/adm_portal या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशासाठी अर्ज करता येतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neetu Singh Birthday : १५ वर्षांच्या नीतू सिंह २१ वर्षांच्या ऋषी कपूरच्या पडल्या प्रेमात; आईचा विरोध असूनही झाली सक्सेस लव्हस्टोरी, जाणून घ्या...

Marathi Live News Updates : मुंबईत कोणत्या भागात किती मिलिमीटर पाऊस? वाचा आकडेवारी

Raigad Fort Rain : किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस; धडकी भरवणारा VIDEO समोर

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस, आज सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Pune News: मुंबईतील मुसळधार पावसाने पुणेकरांचे हाल, डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस रद्द; बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी

SCROLL FOR NEXT