बीड : सायबर विभागातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेंचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत. अशातच रणजीत कासलेंविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुधीर छगनराव चौधरी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर चौधरी हे अंबाजोगाई येथे कुणाल एंटरप्राइजेस नावाने एनर्जी ड्रिंकची एजन्सी चालवतात. त्यांचे अंबाजोगाई शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनमधील अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत.
रणजीत कासले यांनी आईची प्रकृती खालावली आहे असा बनाव करून चौधरी यांच्याकडून प्रथम विविध फोन-पे नंबरवरून एक लाख रुपये घेतले. यानंतर १५ एप्रिल रोजी दवाखान्याच्या खर्चासाठी रोख रक्कम लागल्याचं सांगून रेस्ट हाऊस अंबाजोगाई येथे भेट घेऊन पाच लाख रुपये कॅश स्वरूपात घेतले. हे पैसे चौधरी यांनी आपल्या वडिलांच्या खात्यातून काढून दिले होते. यावेळी चौधरी यांच्यासोबत ऋषिकेश अण्णासाहेब लोमटे आणि सुरज किर्तन हे दोन मित्रही उपस्थित होते. फसवणूक झाल्याप्रकरणी चौधरी यांच्या फिर्यादीवरून बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज निलंगेकर करत आहेत.
बीडच्या सायबर विभागातील बडतर्फ PSI रणजीत कासले यांना स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतलं आहे. रणजीत कासलेंच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास बीडचे पोलीस उपविभागीय अधिकारी विश्वंभर गोल्ड यांच्याकडे आहे. दरम्यान, कासले यांना कोर्टात हजर केल्यानंतर पोलिसांकडून ११ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. रणजीत कासले यांच्याकडून वकील शशिकांत सावंत यांनी बाजू मांडली, तर सरकारी पक्षाच्या वतीने वकील म्हणून लोखंडे यांनी बाजू मांडली. दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने रणजीत कासले यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.