Ranjit Kasle : बीडमधील निलंबित PSI रणजीत कासलेंना दणका; कोर्टाने सुनावली ३ दिवसांची पोलीस कोठडी

Ranjit Kasle Three Day Police Custody : बीडच्या सायबर विभागातील बडतर्फ PSI रणजीत कासले यांना स्थानिक गुन्हे शाखेने आज सकाळी ताब्यात घेतलं आहे. कासले यांना कोर्टात हजर केल्यानंतर पोलिसांकडून ११ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती.
suspended PSI Ranjit Kasle sent to three days police custody
suspended PSI Ranjit Kasle sent to three days police custodySaam Tv News
Published On

बीड : बीडच्या सायबर विभागातील बडतर्फ PSI रणजीत कासले यांना स्थानिक गुन्हे शाखेने आज सकाळी ताब्यात घेतलं आहे. रणजीत कासलेंच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास बीडचे पोलीस उपविभागीय अधिकारी विश्वंभर गोल्ड यांच्याकडे आहे. दरम्यान, कासले यांना कोर्टात हजर केल्यानंतर पोलिसांकडून ११ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. रणजीत कासले यांच्याकडून वकील शशिकांत सावंत यांनी बाजू मांडली, तर सरकारी पक्षाच्या वतीने वकील म्हणून लोखंडे यांनी बाजू मांडली. दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने रणजीत कासले यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमकं प्रकरण काय?

निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले काल अखेर पुण्यात दाखल झाले. मात्र, त्यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी यावेळी खळबळजनक आरोप आणि मोठे गौप्यस्फोट केले आहेत. बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर आपल्याला मिळाली होती, असा दावा काही दिवसांपूर्वी रणजित कासले यांनी केला होता. त्यानंतर ते काल पुण्यात दाखल झाले होते.

suspended PSI Ranjit Kasle sent to three days police custody
Ranjit Kasale : कराडचं एन्काऊंटर ते विधानसभा निवडणुकीत EVMशी छेडछाड; सस्पेंड PSI रणजित कासलेंची A टू Z माहिती

रणजित कासले यांनी पत्रकारांशी बोलताना खळबळजनक आरोप केले आहेत. 'ज्या दिवशी मतदान होते, त्यादेवशी माझ्या बँक खात्यात १० लाख रुपये जमा झाले होते. ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी मला हे पैसे देण्यात आले होते', असा दावा कासले यांनी केला आहे. त्यांनी त्यांचं बँक स्टेटमेंट देखील यावेळी दाखवलं आहे. तसेच वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरच्या ऑफरबाबत देखील त्यांनी मोठा दावा केला आहे.

‘मला एन्काऊंटरबद्दल प्रश्न विचारण्यात आले, माझ्याकडे पुराव्याची मागणी करण्यात आली. एन्काऊंटरचा आदेश असा उघडपणे कोणी देईल का? एन्काऊंटरच्या ज्या चर्चा झाल्या, त्या सर्व चर्चा या बंद दाराआड झाल्या, असं रणजित कासले यांनी म्हटलं आहे.

suspended PSI Ranjit Kasle sent to three days police custody
MNS Protest : हिंदी सक्तीचा वाद चिघळणार! मनसेककडून हिंदी माध्यमांची पुस्तके जाळण्याचा प्रयत्न

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com