Buldhana Breaking News: Saamtv
क्राईम

Buldhana Crime: ज्वेलर्स मालकावर जीवघेणा हल्ला! चाकूने वार, डोळ्यात मिरची पूड टाकून दागिने लुटण्याचा प्रयत्न; बुलढाणा हादरलं

Buldhana Breaking News: बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथे एका ज्वेलर्स मालकावर प्राणघातक हल्ला करत दरोडेखोरांनी सोन्या, चांदीचे दागिने हिसकण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. राजेंद्र वाघ यांनी प्रतिकार केला असता त्यांच्यावर या दरोडेखोरांनी चाकूने सपासप वार करून त्यांना जखमी केले.

Gangappa Pujari

संजय जाधव बुलढाणा, ता. २३ जून २०२४

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथे एका ज्वेलर्स मालकावर प्राणघातक हल्ला करत दरोडेखोरांनी सोन्या, चांदीचे दागिने हिसकण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. राजेंद्र वाघ असे या ज्वेलर्स मालकाचे नाव असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस स्टेशन जवळच घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल सायंकाळी मोताळा येथील विजय ज्वेलर्स चे मालक राजेंद्र वाघ हे सोन्या, चांदीचे दुकान बंद करून आपल्या गावी जात होते. यावेळी पुन्हई फाट्यावर तीन मोटारसायकलवर ६ दरोडेखोर आले आणि त्यांनी राजेंद्र वाघ यांच्याजवळ जाऊन त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली.

तसेच त्यांच्याजवळील सोन्या, चांदीचे दागिने असलेली पिशवी हिसकण्याचा प्रयत्न केला. मात्र राजेंद्र वाघ यांनी प्रतिकार केला असता त्यांच्यावर या दरोडेखोरांनी चाकूने सपासप वार करून जखमी केले. या वेळी राजेंद्र वाघ यांनी आरडा ओरड केल्यानंतर अज्ञात 6 जण पळून गेले. मात्र या झटापटीत राजेंद्र वाघ हे जबर जखमी झाले.

त्यांच्या गळ्यावर आणि हातावर चाकुचे वार केल्याने ते जखमी झाले आसुन त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थली पोहचून पंचनामा करत दरोडेखोरांचा शोध घेणे सुरू केले. मात्र या घटनेने मोताळा तालुक्यात एकच खळबळ उडाली असून दहशतीच वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT