Buldhana News Saamtv
क्राईम

Buldhana News: संतापजनक! पोलीस ठाण्यात फिर्यादीलाच बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल, बुलढाणा जिल्ह्यातील घटना

Buldhana News: विशेष म्हणजे मारहाण करतानाचा व्हिडिओ आरोपीनेच बनवला आणि समाजमाध्यमांवर व्हायरल केला. बुलढाणा पोलिसांचा हा अजब कारनामा समोर आल्याने जिल्ह्यात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. २ मार्च २०२४

Buldhana Breaking News:

बुलढाणा जिल्ह्यातील तामगाव पोलीस ठाण्यात फिर्यादीलाच पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेख मतीन शेख मोबीन हा रिक्षाचालक तरुण आहे. त्याचा भाड्याने ऑटो रिक्षा का घेत नाही, म्हणून दोन युवकांमध्ये वाद झाला होता. वादानंतर या प्रवाशाने तामगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिस स्टेशनला बोलावले.

यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल असलेल्या तरुणावर कोणतीही कारवाई न करता फिर्यादीलाच बेदम मारहाण केली. पोलीस या रिक्षाचालक तरुणाला बेल्टने बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे मारहाण करतानाचा व्हिडिओ आरोपीनेच बनवला आणि समाजमाध्यमांवर व्हायरल केला. बुलढाणा पोलिसांचा हा अजब कारनामा समोर आल्याने जिल्ह्यात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आज या पोलिसाला निलंबित करून त्याचे विरुद्ध कारवाई करीत असल्याचे सांगितले आहे. तसेच ज्याला मारहाण झाली त्याची तक्रार केंद्रीय व राज्य मानावधिकारकडे तक्रारसुद्धा करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT