Kalyan News: कल्याणमध्ये मनसैनिकांकडून फेरीवाल्यांना मारहाण; पोलिसांकडून ६ ते ७ जणांविरोधात गुन्हा

Kalyan MNS News: मराठी तरुणाला मारहाण करणाऱ्या फेरीवाल्याविरोधातही महात्मा फुले पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्या नोंदवला.
kalyan police registered a case against MNS workers for beating non Marathi hawkers
kalyan police registered a case against MNS workers for beating non Marathi hawkersSaam TV
Published On

Kalyan MNS Beaten Non Marathi

तुम्ही मराठी लोक अशीच असता, असं म्हणत कल्याणमध्ये एका परप्रांतीय फेरीवाल्यांनी मराठी तरुणाला बेदम मारहाण केली. हा प्रकार समोर येताच मनसैनिकांनी या फेरीवाल्यांना चोप देत चांगलाच इंगा दाखवला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला. मात्र, व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी सहा ते सात मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

kalyan police registered a case against MNS workers for beating non Marathi hawkers
Bacchu Kadu News: कामापुरतं वापरुन फेकून देण्याचे धंदे भाजपने बंद करावेत; आमदार बच्चू कडू कडाडले

याशिवाय मराठी तरुणाला मारहाण करणाऱ्या फेरीवाल्याविरोधातही महात्मा फुले पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्या नोंदवला आहे. मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर (MNS News) गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे आमदार राजू पाटील यावरुन पोलिसांना जाब विचारणार आहे.

नेमकी घटना काय?

कल्याण स्कायवॉकवर परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा तिथे बसणाऱ्या फेरीवाल्यांसोबत मराठीत बोलण्यावरुन वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला, की फेरीवाल्यांनी या तरुणाला बेदम मारहाण केली. या संपूर्ण प्रकाराची माहिती परिसरातील मनसे कार्यकर्त्यांना कळाली.

त्यांनी तातडीने कल्याण स्कायवॉक गाठत तिथे बसलेल्या फेरीवाल्यांची चांगलीच धुलाई केली. मनसैनिक फेरीवाल्याला चोप देत असताना काहींनी या घटनेचा व्हिडीओ देखील बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

या संपूर्ण प्रकारानंतर मारहाण झालेल्या फेरीवाल्यांनी महात्मा फुले पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सहा ते सात मनसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय मराठी तरुणाला मारहाण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधातही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

kalyan police registered a case against MNS workers for beating non Marathi hawkers
Maharashtra Politics: पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार, दिल्लीतून आली गुड न्यूज; अमित शहांसोबत काय चर्चा झाली?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com