Tejas Lawande Saam Tv
क्राईम

Buldhana News: कर्जबाजारीपणाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल, बुलढाण्यात 22 वर्षीय शेतकरी पुत्राची आत्महत्या

Farmer Son End His Llife: बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंदखेड येथील २२ वर्षाच्या शेतकरी तरूणाने कर्जाला कंटाळून जीवन संपवलं आहे.

Rohini Gudaghe

Buldhana Crime News

कर्जबाजारीपणाला कंटाळून एका २२ वर्षीय शेतकरी पुत्राने जीवन संपवलं (Farmer Son End His Llife) आहे. शेतात विष प्राशन करून त्याने आत्महत्या केली आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे घडली आहे. या घटनेबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Crime News)

मोताळा तालुक्यातील नावलौकिक असलेले सिंदखेड (Sindkhed) येथील २२ वर्षीय तेजस रामेश्वर लवांडे याने आपलं जीवन संपवलं आहे. तेजसचं सिंदखेड सिरमील शिवारात स्वत:चं शेत आहे. नेहमीप्रमाणे तो शेतात गेला. बराच उशीर झाल्यानंतरही तो घरी परतला (Buldhana News) नाही. त्यामुळे वडिलांना काळजी वाटू लागली. त्यानंतर त्यांनी तेजसला फोन लावला. परंतु त्याने फोनला देखील प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची चिंता आणखी वाढली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विषारी औषध पिऊन आत्महत्या

काळजीपोटी तेजस फोन उचलत नसल्यामुळे त्यांनी आपला पुतण्या विशाल रमेश लवांडे याला ही घटना सांगितली. विशाल रमेशला बघण्यास शेतात गेला. त्याने शेतात जावून पाहिले असता, त्याला मोठा धक्का बसला. तेजस लवांडे हा मक्याच्या शेतात मृतावस्थेत पडलेला होता. त्याच्या तोंडातून आणि नाकातून लाळ आणि फेस येत होता. त्याच्याजवळ गेला असता विशालला विषारी औषधाचा वास (Crime News) आला.

विशालने फोन करून ही घटना तेजसच्या वडिलांना सांगितली. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तरूण पोरगा गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. परिसरात सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

बॅंकेच्या कर्जाला कंटाळून टोकाचा निर्णय

तेजसने एसबीआय बॅंकेकडून दिड लाख रूपयांचं कर्ज घेतलं होतं. परंतु या कर्जाची परतफेड त्याच्याकडून होत नव्हती. शेतीतील न परवडणारं उत्पादन आणि बॅंकेच्या कर्जाला कंटाळून तेजसने टोकाचं निर्णय घेतला आणि जीवन (end his life by poisoning) संपवलं.

या घटनेची माहिती आणि तोंडी फिर्याद विशाल रमेश लवांडे याने धामनगावबढे पोलिसांत दिली आहे. तेजस हा मनमिळावु स्वभावाचा होता. तरूण पोरगा गेल्यामुळे आई वडिलांना अश्रु अनावर झाले (Buldhana Crime News) आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांची बारामतीमधून १५०० मतांनी आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT