Crime News  Saam TV
क्राईम

Buldhana Crime: बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात जबरी चोरी, मारहाण करत दागिने लुटले; परिसरात खळबळ

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातून जबरी चोरीची घटना समोर आली आहे. तालुक्यातील पळसखेड शिवारात रात्रीच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी दोन महिलांसह त्यांच्या पतीला मारहाण केली.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. २३ जानेवारी २०२४

Buldhana Crime News:

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातून जबरी चोरीची घटना समोर आली आहे. तालुक्यातील पळसखेड शिवारात रात्रीच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी दोन महिलांसह त्यांच्या पतीला मारहाण केली, त्यानंतर दोघींच्या अंगावरील दागिने हिसकावून पसार झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (Crime News in Marathi)

कांताबाई कांगणे त्यांचे पती व सवतीसह लोणार तालुक्यातील पळसखेड शिवारात राहतात. काल रात्री (२२ जानेवारी) त्या सवत कायराबाई यांच्यासह घरात झोपलेल्या होत्या. त्यांचे पती शंकर कांगणे घराबाहेरील खाटेवर झोपलेले होते, झोपेत असतानाच त्यांच्या पतीचा ओरडण्याचा आवाज ऐकुन त्या जागी झाल्या. यावेळी तिघे चोर त्यांच्या पतीला लोखंडी रॉडने मारहाण करत असल्याचे दिसले

त्यातील एकाने त्यांच्या पतीचे हातपाय बांधून ठेवले, त्यांनतर दोघे घराच्या आत शिरले व दोघांनी महिलांना मारहाण सुरू केली. तसेच दोघींच्या गळ्यातील, कानातील दागिने, हिसकावले घरातून बाहेर पडताना सुध्दा दोघांनी कायराबाईला जबर मार दिला. या मारहाणीत कायराबाई तसेच शंकर कांगणे गंभीर जखमी झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यांना उपचारासाठी जालना येथे दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे दोघांना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर आज २३ जानेवारीच्या सकाळीच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. अज्ञात चोरट्याविरुद्ध लोणार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व पुढील तपास अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT