Navi Mumbai Crime Yandex
क्राईम

Navi Mumbai Crime: नोकरदार तरुणीवर २ वर्षापासून सुरू होता अत्याचार; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

Bharat Jadhav

Navi Mumbai Crime:

बीएमसीमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणीवर २ वर्षांपासून अत्याचार केल्याप्रकरणी अहमदनगरमधील व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात कामोठे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आलीय. मात्र अद्याप याप्रकरणात आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये. (Latest News)

नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडलीय. बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीवर दोन वर्षापासून अत्याचार होत होता. याप्रकरणात अहमदनगरमधील एका व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, अत्याचार करणारा आरोपी हा तरुणीला ब्लॉकमेल करत होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पीडिता बीएमसीमध्ये नोकरीला आहे, तर आरोपी व्यक्ती हा अहमदनगरमधील राहणारा आहे. तरुणीने अत्याचाराची तक्रार कामोठे पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलीय. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी व्यक्तीने तरुणीशी आधी मैत्री केली. तिचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. सलग दोन वर्षांपासून या व्यक्तीने तरुणीवर अत्याचार केला. बदनाम करण्याची धमकी देत हा व्यक्ती तरुणीवर वारंवार अत्याचार केला.

४ वर्षीय चिमुकलीवर सुरक्षारक्षकाने केला अत्याचार

मुंबईत चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी झाली होती. पीडित मुलगी शिकत असलेल्या नर्सरीच्या सुरक्षा रक्षकानेच हे दुष्कृत्य केलं. पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक याप्रकणात अटक केली. ही घटना . कांदिवली परिसरात घडली होती. आरोपीने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने स्वच्छतागृहात नेऊन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती.

अल्पवयीन विद्यार्थिनीवर ५९ वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार

पिंपरी चिंचवडमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. एका ५९ वर्षीय व्यक्तीने विद्यार्थिनीवर अत्याचार केला होता. घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रावेत परीसरातील एका अकॅडमीच्या संचालकानेच हे कृत्य केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

Marathi Sahitya Samelan : मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर

Chandrapur News : अवैध धंदे रोखण्यासाठी चकपिरंजी ग्रामसभेत अनोखा ठराव; शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी टाकली अट

SCROLL FOR NEXT