Bihar Crime News: Saam Digital
क्राईम

Bihar Crime News: धक्कादायक! जमिनीचा वाद विकोपाला गेला, भांडणानंतर ५ जणांना ट्रॅक्टरने चिरडलं

Bihar Vaishali Crime News In Marathi: बिहारच्या वैशाली जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या वैशालीत जमिनीच्या वादातून दोन गटात जोरदार भांडण झाल्याची घटना घडली.

Vishal Gangurde

Bihar Vaishali Crime News:

बिहारच्या वैशाली जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या वैशालीत जमिनीच्या वादातून दोन गटात जोरदार भांडण झाल्याची घटना घडली. या दोन्ही गटाचा वाद इतका टोकाला गेला की, एका गटाने दुसऱ्या गटातील ५ जणांना ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

बिहारच्या वैशालीतील रुस्तमपूर पोलीस स्टेशनच्या कर्मापूर येथे शेत जमिनीच्या तुकड्यावरून दोन गटाचा वाद टोकाला पोहोचला. शेत जमिनीच्या(Farm) तुकड्यावरून सुरु झालेल्या वादात दोन्ही गटाचे लोक आमनेसामने आले. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर लाठी-काठ्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन्ही गटातील लोक या लाठीकाठीच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. तर या वादात एका गटातील व्यक्तीने दुसऱ्या गटातील लोकांना ट्रॅक्टरने चिरडलं.

या व्यक्तीने ट्रॅक्टरने चिरडल्याने पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या पाच जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर या घटनेत पाच जणांची प्रकृती चितांजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

जमिनीच्या तुकड्यावरून सुरू झालेल्या वादानंतर दोन्ही गटाने एकमेकांवर एफआयआर दाखल केली आहे. तर दोन्ही गटातील लोकांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची पुढील कारवाई पोलिसांनी सुरु केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prolonged sitting: तासन्‌तास एकाच जागी बसून राहता? सावधान! कॅन्सरमुळे मृत्यूचा धोका वाढत असल्याचा संशोधनातून धक्कादायक खुलासा

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा 18k- 22k आणि 24kचे दर

Chanakya Niti: कमी वेळेत श्रीमंत कसं बनाल? आचार्य चाणक्यांनी सांगितलाय मार्ग

Bribe Case : कोकणात खळबळ! बड्या अधिकाऱ्याने NOC साठी मागितली खड्याची अंगठी; असा अडकला ACB च्या जाळ्यात

Kidney Damage : किडनी खराब होण्याआधी डोळे देतात 'हे' ५ संकेत, दुर्लक्ष करू नका नाहीतर...

SCROLL FOR NEXT