Bihar Crime News Saam Tv
क्राईम

Crime News: घरासमोर खेळताना उचलून नेलं, शाळेमागे घेऊन गेला अन्...; तरुणाने चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडले

Bihar Crime News: बिहारमध्ये ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. घरासमोर खेळत असताना या मुलीचे अपहरण करण्यात आले. आरोपीने तिला शाळेच्या पाठीमागे नेऊन तिच्यासोबत भयंकर कृत्य केलं.

Priya More

बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पूर्णिया जिल्ह्यातल्या धमदाहा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. गावातीलच १९ वर्षीय तरुणाने हे धक्कादायक कृत्य केले. पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ वर्षांची मुलगी रविवारी रात्री ८ वाजता घरासमोर खेळत होती. यावेळी आरोपी तरुण त्याठिकाणी आला. आरोपीने सर्वांची नजर चुकवत चिमुकलीला उचलून नेले. गावातील शाळेच्या पाठीमागे नेऊन या मुलीवर आरोपीने बलात्कार केला. चिमुकली वेदनेमुळे जोरजोरात रडत होती. आरोपी तिला त्याच अवस्थेत तिथे सोडून पळून केला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून गावकरी तिथे पोहचले. मुलगी हरवल्यामुळे घरचे तिला शोधतच होते. तिची अवस्था पाहून तिच्या आईला धक्का बसला. मुलीला घेऊन ती घरी आली.

पीडित मुलीच्या आईने सांगितले की, तिचा नवरा कामासाठी बाहेरगावी गेला आहे. त्यामुळे ती रात्री मुलीला घेऊन रुग्णालयात गेली नाही. घटनेपासून मुलगी सतत रडत होती. सोमवारी सकाळी तिला घेऊन रुग्णालयात गेले. प्रकृती गंभीर असल्याचे पाहून डॉक्टरांनी तिला पूर्णिया येथील रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले.' डॉक्टरांनी सांगितले की, मुलीची प्रकृती गंभीर होती.

या प्रकरणी आरोपी तरुणाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी टीम तयार केली आहे. पीडित मुलीचे कपडे आणि आणखी काही वस्तू पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केल्या आहेत. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याा शोध घेत आहेत. या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pink E Rikshaw: खुशखबर! आता एकही रुपया न भरता महिलांना मिळणार पिंक रिक्षा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Smartphone Features: तुमच्या स्मार्टफोनमध्ये लपलेली 'ही' गुप्त फीचर्स माहिती आहेत का? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: जायकवाडी धरण ९१ टक्के भरले, आज धरणाचे दरवाजे १८ फुटांनी उघडणार

Prajakta Mali: खुशखबर! प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' आता मोफत पाहायला मिळणार, कधी अन् कुठे? वाचा अपडेट

Shirdi to Tirupati : शिर्डीवरून तिरुपतीला झटक्यात पोहचा, तब्बल १८ एक्सप्रेस धावणार, कोणकोणत्या स्थानकात थांबणार ट्रेन?

SCROLL FOR NEXT