sana makbul: बिग बॉस ओटीटीची विजेती सना मकबूल रुग्णालयात दाखल आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. सनाची मैत्रीण आशनाने सोशल मीडियावर तिच्या प्रकृतीबद्दल पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये सनाला रुग्णालयात का दाखल करण्यात आले आहे याचा उल्लेख नाही, परंतु आशनाने लिहिले आहे की तिला काही गंभीर आरोग्य समस्येमुळे दाखल करण्यात आले आहे. सनाच्या मैत्रिणीने इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेल्या स्टोरीत ती हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे. तिच्या हातात ड्रिप लावली आहे.
सनाच्या मैत्रिणीने लिहीले की...
सना मकबूलच्या मैत्रिणीने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "माझी सुंदर आणि सर्वात मजबूत मैत्रीण. मला अभिमान आहे की तू इतक्या गंभीर परिस्थितीतही धैर्य दाखवत आहेस आणि खंबीरपणे उभी आहेस. इन्शा अल्लाह, तू या आजाराशी देखील लढशील आणि पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत होऊन परत येशील. अल्लाह तुझ्यासोबत आहे. मीही नेहमीच तुझ्यासोबत आहे. तू लवकरच बरी होशील." सलमान खानने आयोजित केलेल्या शोमध्ये सना मकबूल आणि रणवीर शौरी यांच्यातची स्पर्धा होती. शोमधील तिच्या दृष्टिकोनाची खूप चर्चा झाली.
सना मकबूल पूर्वीच ऑटोइम्युन हेपाटायटिस लिव्हरशी संबंधित रोगने त्रस्त असल्याचे उघडकीस आले होते. २०२० पासून तिचा हा आजार सुरू असल्याचे आणि तिच्या शरीरातील इम्यून सेल्यूल्सने आपल्या लिव्हरवर हल्ला करत असल्याचे तिने भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये सांगितले होते. त्या वेळी सीनियर्स्टेरॉइड्स, इम्यूनोसप्रेसंट्स आणि वेगन आहारामुळे इलाज सुरू असल्याचेही स्पष्ट केले होते.
तिच्या “संडेज विथ सना” इन्स्टाग्राम मालिकेमध्ये त्यांनी सांगितले की, २०२३ मध्ये लिव्हरचा आजार स्टेज ४ वर गेला पण तीने वेळोवेळी चाचण्या करून स्टेज कमी केला आहे. आता तिच्या चाहते तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. सना जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बरे होवो, अशी सर्वांची इच्छा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.