Jolly LLB 3: अक्षय कुमार- अरशद वारसीला उच्च न्यायालयाकडून दिलासा; 'जॉली LLB 3' वादावर कोर्टाचा मोठा निर्णय

Jolly LLB 3: बॉलिवूड सुपरस्टार खिलाडी अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या जॉली LLB 3 या चित्रपटाच्या शूटिंगवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
Jolly LLB 3
Jolly LLB 3Saam Tv
Published On

Jolly LLB 3: बॉलिवूड सुपरस्टार खिलाडी अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या जॉली LLB 3 या चित्रपटाच्या शूटिंगवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अजमेर बार असोसिएशनने दाखल केलेल्या या याचिकेत चित्रपटात वकिलांचा आणि न्यायालयाचा अवमान करणारे प्रसंग दाखवले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, अजून चित्रपट पूर्ण झालेला नाही, त्यामुळे केवळ तर्कावरून बंदी घालता येणार नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं.

बार असोसिएशनच्या म्हणण्यानुसार चित्रपटात वकिलांना गटारात बसवणं, त्यांच्यावर लाठ्या चालवणं, न्यायाधीश गुटखा खाताना दाखवणं अशा अनेक अपमानास्पद गोष्टी दाखवल्या जात आहेत. त्यामुळे वकिलांच्या प्रतिमेला धक्का बसतो आणि न्यायसंस्थेची खिल्ली उडवली जाते, असा दावा करण्यात आला. त्यांनी अजमेरच्या सिव्हिल कोर्टात आधी अर्ज दाखल केला होता, नंतर हा वाद उच्च न्यायालयात गेला.

Jolly LLB 3
Little Thomas: अनुराग कश्यपचा 'लिटल थॉमस'चा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका; भारतातआधी न्यूयॉर्कमध्ये होणार चित्रपट प्रदर्शित

दिग्दर्शक सुभाष कपूर, आणि अभिनेते अक्षय कुमार व अरशद वारसी यांनी कोर्टात दाखल याचिकेत असं सांगितलं की, शूटिंगसाठी सर्व कायदेशीर परवानग्या घेतल्या आहेत. अजमेर DRM ऑफिसमध्ये शूटिंगसाठी रेल्वेकडून मान्यता घेण्यात आली होती आणि त्यासाठी २५ लाख फीही भरली होती. शिवाय, चित्रपट सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून पास होतोच, त्यामुळे कोणताही गैरप्रकार झाल्यास त्यावर ती संस्था कारवाई करू शकते.

Jolly LLB 3
Silky Soft Hairs: रेशमी मऊ आणि चमकदार केसांसाठी घरी करा 'हा' सोपा उपाय, आठवड्याभरात दिसेल फायदा

न्यायालयाने स्पष्ट केलं की अजून चित्रपट प्रदर्शितच झालेला नाही, त्यामुळे त्यात नक्की काय आहे, हे ठामपणे सांगणं शक्य नाही. फक्त संभाव्य दृश्यांवर आधारित तक्रार स्वीकारता येणार नाही. त्यामुळे, जॉली LLB 3 च्या शूटिंगला कोणतीही बंदी नाही आणि चित्रपटमधील विषयावर निर्णय सेंसर बोर्ड घेईल, असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com