Shruti Kadam
दहीमध्ये अंडं मिसळून केसांना लावल्यास केसांना नैसर्गिक पोषण मिळतं आणि ते मऊ व चमकदार होतात.
अॅलोवेरा जेल थेट केसांवर लावल्यास कोरडेपणा कमी होतो आणि केस नरम व लवचिक होतात.
एक पक्की केळी मॅश करून त्यात मध घालून हेयर मास्क तयार करा. हा मास्क केसांना मऊपणा आणि पोषण देतो.
नारळाच्या तेलात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचं तेल मिसळून मालिश केल्यास केसांची रचना सुधारते आणि ते अधिक चमकदार होतात.
रात्री भिजवलेले मेथी दाणे वाटून पेस्ट बनवा व केसांना लावा. यामुळे केस गळती कमी होते आणि मऊपणा वाढतो.
बादाम, अक्रोड आणि काजूच्या तेलांचं मिश्रण केसांना लावल्यास केस मजबूत, रेशमी आणि निरोगी राहतात.
भिजवलेल्या भाताचं पाणी केसांवर शॅम्पूनंतर शेवटी घालावं. हे केस मऊ, सरळ आणि चमकदार बनवण्यास मदत करतं.