Bihar Crime  Saam Tv
क्राईम

Bihar Crime News: ऑर्केस्ट्रा डान्सरसोबत बूक केली हॉटेलची रुम; तोंडात टाकली पिस्तूल नंतर..

Crime News: बिहारच्या मुझफ्फरपूरच्या एका हॉटेलमध्ये एका ऑर्केस्ट्रा डान्सरवर प्राणघात हल्ला झाल्याची घटना घडलीय. या हल्ल्यात महिला डान्सर गंभीर जखमी झालीय. दरम्यान पीडिता हॉटेलच्या रुममधून पळून जाण्यास यशस्वी झालीय.

Bharat Jadhav

Bihar Crime News:

ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्या महिलेवर गोळीबार झाल्याची घटना बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात घडली. येथील हॉटेलमध्ये गोळीबारीची घटना घडली. आरोपी आणि पीडिता महिलेने हॉटेलमध्ये एक खोली बूक केली होती. ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्या महिलेला खोलीमध्ये नेल्यानंतर आरोपीने तिच्यावर गोळीबार केला. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेल्याची माहिती शहराचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अवधेश सरोज दीक्षित यांनी दिली.(Latest News)

काय आहे प्रकरण

अतिरिक्त पोलीस अधीक्षक सांगितलं की, आरोपीचं नाव इमरान अली आहे. मंगळवार रात्री इमरान अलीने मिठनपुरा चौकातील एलवी इंटरनॅशनल हॉटेलमध्ये एक खोली बूक केली होती. इमरान हा ऑर्केस्ट्रा डान्सरसोबत आला होता. त्याने तिच्यासाठी लॉलीपॉप मागवला, दोघांनी लॉलीपॉप खाल्लं. काहीवेळानंतर आरोपीचा मूड बदलला आणि पीडितेच्या तोंडात पिस्तूल टाकली आणि गोळी झाडली. यात पीडिता गंभीर जखमी झाली.

दरम्यान पीडिता महिला खोलीचा दरवाजा उघडण्यास यशस्वी ठरली आणि बेशुद्ध होण्याच्या आधी रिसेप्शन खोलीत पोहोचली. या घटनेची अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक म्हणाले, आरोपीने महिलेच्या तोंडात पिस्तूल टाकली आणि गोळी झाडली. ही गोळी महिलेचा गाल चिरत बाहेर पडली होती. पोलिसांना गोळीबार ज्या खोलीत झाला त्या ठिकाणी दोन जिवंत काडतूसे सापडली. खोलीतील अंथरूणावर रक्त पडले होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला सिलीगुडी येथील रहिवासी आहे. ती मुझफ्फरपूर येथे ऑर्केस्ट्रामध्ये काम करते. मुझफ्फरपूर येथे ती मालीघाटमध्ये आपल्या आजीसोबत राहत होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान हॉटेलच्या मालकिण नीलू भारती यांनी सीसीटीव्ही पाहिल्यानंतर गोळीबार झाल्याचं समजलं. घटनेविषयी माहिती देताना त्यांनी सांगितलं त्यांचे हॉटेल बऱ्याच दिवसापासून बंद होते. काही दिवसांपूर्वी ते पुन्हा चालू केल्याने येथे कमी ग्राहक येतात. यामुळे हॉटेलमध्ये कमी कर्मचारी ठेवले आहेत. मंगळवारी सायंकाळी एका जोडप्याने रुम बूक केल्याची माहिती कर्मचाऱ्याने दिली होती.

रात्री जेवण करत असताना आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करत असल्याचं नीलू भारती म्हणाल्या. त्यात रिसेप्शनच्या खोलीत एक महिला खाली पडलेली दिसली, त्या तडफडत होती. त्यानंतर आपण हॉटेल कर्मचारीला त्याविषयी विचारणा तेव्हा त्या महिलेला गोळी मारल्याचं समजलं. तर हॉटेलचे संचालक स्वजन म्हणाले गोळीबारात जखमी झालेली महिला ही या हॉटेलमध्ये ४ते ५ वेळा थांबलेली होती. मागे सप्टेंबर महिन्यात ही महिला याच आरोपीसोबत थांबली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

Sillod News : सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

SCROLL FOR NEXT