Bihar Crime Saam Tv
क्राईम

Crime: घरी जाणाऱ्या तरुणीचं अपरहण, जबरदस्ती दारू पाजली; ६ जणांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार

Bihar Crime: बिहारमध्ये तरुणीची अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात असल्याची घटना घडली. तरुणीला दारू पाजून रात्रभर आरोपींनी हे भयंकर कृत्य केले. पोलिसांनी सहाही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.

Priya More

Summary -

  • बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार

  • घरी जात असताना तरुणीचे अपहरण

  • जबरदस्ती दारू पाजून रात्रभर सामूहिक बलात्कार

  • पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून ५ जणांचा शोध सुरू आहे

बिहारमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली. ६ तरुणांनी पीडित तरुणीचे अपहरण करून तिला दारू पाजली. त्यानंतर तिच्यावर रात्रभर आळीपाळीने बलात्कार केला. पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे बिहार हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पूर्णियाच्या जगरूआ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बरियार चौकातील जया ट्रेडर्स येथे घडली. पोलिसांनी घटनास्थळावरून जया ट्रेडर्सचे संचालक मोहम्मद जुनेदला अटक केली. पीडित तरुणी नेवललाल चौकातून आपल्या घराच्या दिशेने चालत जात होती. त्याचवेळी त्याठिकाणी एक कार आली. या कारमध्ये सहा तरुण बसले होते. या तरुणांनी पीडित तरुणीला अडवले आणि तिला जबरदस्ती कारमध्ये बसवलं. तरुणीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तर आरोपींनी तिचे तोंड दाबले.

त्यानंतर आरोपींनी पीडित मुलीला बरियार चौक येथील जया ट्रेडर्स याठिकाणच्या एका खोलीमध्ये नेले. त्याठिकाणी पीडित मुलीला ओलीस ठेवले. आरोपींनी पीडित मुलीला जबरदस्ती दारू पाजली. त्यानंतर सहाही आरोपींनी रात्रभर आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पाच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्याठिकाणी एक आरोपी मोहम्मद जुनेद थांबला होता. आरोपी दारूच्या नशेत होता. गंभीर स्थिती असतानाही तरुणीने आरोपीचा मोबाईल घेतला आणि पोलिसांच्या ११२ क्रमांकावर फोन लावला आणि घडलेल्या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. खोलीला बाहेरून टाळा लावला होता. पोलिसांनी टाळा तोडला आणि आतमध्ये प्रवेश केला. तर आतमधील परिस्थिती खूपच भयंकर होती. पीडित तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती. तर आरोपी तिच्या शेजारी झोपला होता. पोलिसांनी तात्काळ आरोपी मोहम्मद जुनेला अटक केली. पीडित तरुणीला तात्काळ जीएमसीएच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पाच आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी राष्ट्रपतींची तब्येत बिघडली; दोन वेळा बेशुद्ध झाल्यानंतर थेट AIIMS मध्ये दाखल

Maharashtra Live News Update : एका घरात तीन लोकांना मिळून १५ कोटींची ऑफर- राज ठाकरे

Face Care: नॅचरल ग्लोईंग स्किन हवी असेल तर रोज रात्री चेहऱ्यावर लावा 'हे' जेल आठवड्याभरात मिळेल फरक

Shrikhand Puri Recipe: मकरसंक्रात सणाचा गोडवा वाढवण्यासाठी बनवा स्वादिष्ट श्रीखंड पुरी, वाचा सोपी रेसिपी

मोठी बातमी! ठाकरे बंधूंना मराठा मोर्चाचा पाठिंबा, मनोज जरांगेंचे पोस्टरद्वारे आवाहन, VIDEO

SCROLL FOR NEXT