BIHAR SHOCKING CASE: MARRIED WOMAN ALLEGEDLY KILLED OVER HUSBAND’S ILLICIT AFFAIR Saam tv
क्राईम

Shocking : वहिनीसोबतचं अफेअर पत्नीला समजलं; पतीने प्रेयसीच्या मदतीने केली पत्नीची हत्या, थरारक घटनेने सर्वजण सुन्न

Bihar Crime News : बिहारमधील सुपौल जिल्ह्यात विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असून पती आणि वाहिनीच्या अनैतिक संबंधांमुळे खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • सुपौल जिल्ह्यात विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू

  • पती आणि जावेच्या अनैतिक संबंधांवरून वाद

  • गळा दाबून खून केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

  • पोलिसांकडून तपास सुरू, आरोपी फरार

बिहारमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील सुपौल जिल्ह्यात एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संतापजनक म्हणजे पीडित महिलेच्या लग्नानंतर सुद्धा तिच्या पतीचे आणि तिच्या जावेचे अनैतिक संबंध सुरु होते. महिलेने या प्रेमसंबंधांना विरोध केल्याने तिचा काटा काढला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,मृत महिलेचे नाव बुच्ची देवी असे आहे. तिचा विवाह २०२१ साली सुजित कुमार खरगा याच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतरही पतीचे त्याच्या वाहिनीसोबत अनैतिक संबंध सुरू असल्याचा आरोप आहे. या कारणावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.मंगळवारी घरात कोणतीही हालचाल दिसत नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तात्काळ महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. त्यानंतर तिचा भाऊ ललन कुमार घटनास्थळी पोहोचला असता, घरात बुच्ची देवीचा मृतदेह पलंगावर पडलेल्या अवस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे, घरात कोणीच उपस्थित नव्हते.

मृत महिलेच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, सुजित कुमारने आपल्या वाहिनीच्या मदतीने पूर्वनियोजित कट रचून बुच्चीचा गळा दाबून खून केला. तसेच, पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. गावकऱ्यांच्या मते, या अनैतिक संबंधांमुळे कुटुंबात सतत तणावाचे वातावरण होते. पंचायतीमार्फत अनेक वेळा हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत सुजित आणि त्याच्या कुटुंबीयांनी वाद मिटवण्याचे आश्वासन दिले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी सुरेंद्र कुमार आणि वीरपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी राजकिशोर मंडल घटनास्थळी दाखल झाले. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. पोलीसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा गळा दाबून खून केल्याचा प्रकार असू शकतो. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मे महिन्याची सुरूवात पावसाने होणार, IMD कडून महत्त्वाची अपडेट, नेमका काय वर्तवला अंदाज?

Shivani Rangole Photos: 'लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया...' पिवळ्या साडीत शिवानी रांगोळेचा सोज्वळ अंदाज

Maharashtra News Live Update : बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश

Crime News: धक्कादायक! लग्नाचं आमिष देऊन बलात्कार, अश्लील व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची तरूणाची धमकी

Sanjay Gandhi Niradhar Yojana: महाराष्ट्र सरकारची खास योजना! या नागरिकांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT