Bihar Crime Saam Tv
क्राईम

Crime: मैत्रिणीसोबत जाणाऱ्या मुलीचं अपहरण, शेतात ओढत नेऊन सामूहिक बलात्कार

Bihar Crime: बिहारमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. मैत्रिणीसोबत जाणाऱ्या या मुलीला तिघांनी मक्याच्या शेतात खेचत नेऊन तिच्यासोबत भयंकर कृत्य केले.

Priya More

Summary:

  • बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

  • मैत्रिणीसोबत जाताना आरोपींकडून अपहरण

  • मक्याच्या शेतात खेचत नेऊन सामूहिक बलात्कार करण्यात आला

  • या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली

बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. मैत्रिणीसोबत शेतावर गेलेल्या मुलीचे अपहरण करून मक्याच्या शेतात तिला ओढत नेऊन आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सोमवारी दुपारी सहरसा जिल्ह्यातील नवगट्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली.

सोमवारी दुपारी पीडित मुलगी मैत्रिणीसोबत शेतामध्ये काम करण्यासाठी घरातून निघाली होती. त्याचवेळी ३ तरुणांनी त्यांना रस्त्यात अडवले. आरोपींनी आधी दोन्ही मुलींना धमकावले आणि नंतर त्यांना जबरदस्ती मक्याच्या शेतामध्ये खेचत नेले. जेव्हा पीडित मुलीची मैत्रीण आरडाओरडा करायला लागली तेव्हा एका आरोपीने तिला पकडून तिचे तोंड दाबले. त्यानंतर इतर दोन आरोपींनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर पीडित मुलगी घरी गेली आणि तिने आपल्या आईला सर्वकाही सांगितले.

त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी सोमवारी रात्री पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी या प्रकरणी श्रवण यादव, धनी यादव आणि संतोष यादव या ३ तरुणांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली. या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली असून पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT