Bihar Crime x
क्राईम

Crime: बायकोचं अनेकांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने डोक्यात गोळी झाडून संपवलं

Bihar Crime: बिहारमध्ये एका तरुणाने बायकोची डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली. नवऱ्याला बायकोचे अनेक व्यक्तींसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या रागातूनच त्याने मित्रांच्या मदतीने तिची हत्या केली.

Priya More

Summary -

  • पाटणामध्ये नवऱ्याने बायकोची हत्या केली

  • बायकोच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली

  • अनैतिक संबंध आणि पैशांच्या वादातून ही घटना घडली

  • पोलिसांनी २४ तासांत प्रकरणाचा छडा लावला

बिहारच्या पाटणामध्ये नवऱ्याने बायकोची डोक्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पाटणाच्या जामीपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाजाचक महम्मदपूरमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी अवघ्या २४ तासांमध्ये हत्याकांडाचा छडा लावला. पोलिसांनी महिलेच्या नवऱ्यासह दोघांना अटक केली. महिलेची हत्या तिच्या नवऱ्याने कट रचून केली होती.

२६ लाख रुपये आणि बायकोचे इतर पुरूषांसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत हत्या करण्यात आली. त्याचसोबत महिलेच्या नवऱ्याला असे वाटत होते की जमीन विकल्यानंतर मिळालेले पैसे ती देणार नाही. त्यानंतर आरोपीने मित्रांना सोबत घेऊन बायकोच्या हत्येचा कट रचला आणि तिची हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ जानेवारीला जनैपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत माला देवी नावाच्या एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपासानंतर पोलिसांनी पाली येथील नारायणपूर मुरारी येथील रहिवासी कुणालला जहानाबाद स्टेशनवर अटक केली.

कुणालची पोलिसांनी कसून चौकशी केली. कुणालच्या माहितीवरून घटनेत वापरलेला मोबाइल आणि सिम कार्ड जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान कुणालने हत्येच्या कटात आपली भूमिका कबुल केली आणि हत्या झालेल्या मुलीच्या नवऱ्याचे नाव सांगितले. महिलेचा नवरा सुबोधनेच तिची हत्या करण्यासाठी कट रचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, कुणालने माला देवी यांना गजचक मोहम्मदपूर येथील जमिनीचा भूखंड दाखवण्यास सांगितले होते. त्या बदल्यात जहानाबाद येथील रामपूर बारा येथील सुबोध शर्माने कुणालला पूर्वी दिलेले अडीच लाख रुपयांचे कर्ज फेडणार नाही आणि हत्येनंतर अतिरिक्त पैसे देण्याचे आश्वासन देऊन आमिष दाखवले. ११ जानेवारी रोजी माला देवी प्लॉट पाहण्यासाठी गेल्या. त्याठिकाणी आधीच उपस्थित असलेल्या सुबोध शर्माने तिच्या डोक्यात गोळी झाडली. या घटनेच गंभीर जखमी झालेल्या माला देवीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, राधाकृष्ण विखे पाटील गड राखणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर

Saam Tv Exit Poll: मालेगावमध्ये एमआयएम सर्वात मोठा पक्ष, कुणाची सत्ता येणार?

Night Habits: रात्रीच्या या 5 वाईट सवयींचा आरोग्यावर होतो परिणाम

SaamTV Exit Poll: सांगलीचं मैदान भाजपनं मारलं; एकहाती सत्ता राहणार?

Municipal Elections Voting Live updates: वसई पूर्वेच्या वसंत नगरीतील सेठ विद्यामंदिर मध्ये भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT