Senior police officer sunil thopate Saam Tv
क्राईम

Lalit Patil Case: मोठी बातमी! ड्रग्ज माफिया पाटीलवर कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली

Lalit Patil : वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांच्या पथकाने ललित पाटीलला दोन कोटीच्या ड्रग्जसह पकडलं होतं. थोपटे यांच्या पथकाने ही कारवाई ससून रुग्णालया समोर करण्यात आली होती. ड्रग्ज रॕकेट बाहेर काढणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचीच बदली झाल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Bharat Jadhav

नितीन पाटणकर- पुणे

Senior Police Officer Sunil Thopate Transfer:

ड्रग्ज माफिया ललित पाटील केस प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आलीय. सुनील थोपटे असं या अमली विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. ड्रग्ज रॕकेट बाहेर काढणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचीच बदली झाल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Latest News)

माफिया ललित पाटील (Lalit Patil) हा पुण्यातील ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचाराच्या नावाखाली राहून ड्रग्जचे रॕकेट चालवत होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांच्या पथकाने ललित पाटीलला दोन कोटीच्या ड्रग्जसह पकडलं होतं. थोपटे यांच्या पथकाने ही कारवाई ससून रुग्णालया समोर करण्यात आली होती. दरम्यान या ड्रग्ज प्रकरणांमध्ये अनेक मंत्र्यांची नावे आली आहेत. याचदरम्यान अधिकाऱ्यांच्या बदल्या गेल्या आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुणे शहर पोलीस दलातील एकूण १५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. काल रात्री उशिरा या बदल्याचं कार्यवाही करण्यात आलीय. यामध्ये वरिष्ठ अमली विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची ही बदल करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांची बदली थेट पुणे शहर कंट्रोल रूममध्ये करण्यात आलीय.

दरम्यान, पुणे शहर पोलिसांनी २ ऑक्टोबर २०२३ रोजी ससून रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डमधून ड्रग्ज माफिया ललित अनिल पाटीलने पलायन केलं होतं. त्याच्या या पलायन प्रकरणी डॉ. संजीव ठाकूरवर खटला चालवण्यात यावा, अशी परवानगी पुणे शहर पोलिसांनी राज्य सरकारकडे मागितलीय. पाटील जेव्हा फरार झाला तेव्हा ठाकूर हे सरकारी ससून हॉस्पिटल आणि बीजे मेडिकल कॉलेजचे डीन होते. मात्र ललित पाटील प्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडून निष्काळजीपणा झाल्याच समोर आल्यानंतर ठाकूर यांना डीन पदावरून हटवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT