Bhiwandi Crime News 
क्राईम

Thane : क्रूरतेचा कळस! २२ वर्षीय तरूणीवर ६ जणांचा सामूहिक बलात्कार, आधी झाडाझुडपात नंतर टेम्पोत केला अत्याचार

Crime News : नराधमांनी पीडित तरूणीच्या भावासह रिक्षाचालकाला मारहाण करून पिटाळून लावले. तरूणीला नागाव भागातील एका शाळेच्या मागील झाडीझुपत नेलं अन् सहा नराधमांनी आळीपाळीनं बलात्कार केला.

Namdeo Kumbhar

फय्याज शेख, भिवंडी

Bhiwandi Crime News : ठाण्यातील भिवंडीत मन हेलावणारी घटना घडली आहे. २२ वर्षीय महिलेवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला. तरुणीचे भावासह अपहरण केलं, त्यानंतर झाडाझुडपात अन् टेम्पोमध्ये तिच्यावर आळीपाळीने अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी सहा जणांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. या धक्कादायक घटनेमुळे भिवंडी हादरलेय.

याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात ६ नराधमांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 64 (2) (d), (बलात्कार),70 (1) (सामूहिक बलात्कार), 115(2) (स्वेच्छेने दुखापत करणे) 3 (5) (अनेक व्यक्तींनी सामान्य हेतूने केलेले गुन्हेगारी कृत्य) यानुसार पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद सईद आलम, पाशा, लड्डू आणि गोलू आणि इतर दोन अनोळखी अशी नराधमांची नावे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय पीडित तरूणी भिवंडी शहरातील फातिमानगर भागात राहत असलेल्या मावशीच्या घरी २० फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास झोपली होती. त्यानंतर झोपेतून जाग आल्यानंतर तिने मध्यरात्रीनंतर मोबाईल तपासाला असता तिच्या भावाचे १५ मिस्ड कॉल दिसले. त्यानंतर लगेच तिने मोबाईलवर कॉल केला असता माहिती मिळाली की भावाची तब्येत ठीक नाही. त्यानंतर २१ फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास तातडीने रिक्षा पकडून ती भाऊ वाट बघत असलेल्या ठिकाणी गेली. त्यावेळी नराधमांनी तिच्या भावासह रिक्षाचालकाला मारहाण करून पिटाळून लावले. तरूणीला नागाव भागातील एका शाळेच्या मागील झाडीझुपत नेलं अन् सहा नराधमांनी आळीपाळीनं बलात्कार केला.

त्यानंतर पीडितेला एकटीला घेऊन नराधम फातिमानगर येथे आले. या ठिकणी उभ्या असलेल्या पिकअप व्हॅनमध्येही सामूहिक बलात्कार केला, या घटनेमुळं पीडित महिला भयभीत झाली होती. दरम्यान पीडितेने नराधमाच्या तावडीतून आपली सुटका करत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्यावर घडलेला धक्कादायक प्रसंग सांगताच पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केला. झिरो नंबरने पुढील तपासासाठी शांतीनगर पोलीस ठाण्यात वर्ग केला. पीडितेवर सामूहिक अत्याचार झाला असून या घटनेत सहा आरोपी आहेत. या गुन्ह्यातील एक आरोपी अटक केली आहे. इतर ५ आरोपीचा दोन पोलीस पथक शोध घेत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

SCROLL FOR NEXT