Bhandara Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा डोळा, हत्या करून मृतदेह पाईपलाईनमध्ये टाकला

Bhandara Crime News : भंडाऱ्यात संपत्तीच्या लालसेपोटी जावयाने मित्राच्या मदतीने सासऱ्याची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • संपत्तीच्या वादातून जावयाने केली सासऱ्याची हत्या

  • मित्राच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली

  • मृतदेह शेतातील पुलाखाली पाईपमध्ये लपवला

  • पोलिस तपासात गुन्ह्याचा उलगडा

  • दोन्ही आरोपी अटकेत, पुढील चौकशी सुरू

शुभम देशमुख, भंडारा

सासऱ्याची संपत्ती मिळावी, या लालसेपोटी जावयानंचं सासऱ्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना भंडाऱ्यात समोर आली आहे. मित्राच्या मदतीनंचं जावयानं ही हत्या केल्याप्रकरणी आता कारधा पोलिसांनी आरोपी जावई आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. ही निर्घृण हत्या भंडाऱ्याच्या कोकणागड इथं घडली. किशोर कंगाले (60) असं मृत सासऱ्याचं नावं आहे. तर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीमध्ये जावई अमित लांजेवार (36) आणि त्याचा मित्र योगेश पाठक (26) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत किशोर कंगाले हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून त्यांना एकुलती एक मुलगी असून तिनं अमित लांजेवार याच्यासोबत आंतरजातीय विवाह केला आहे. या विवाहाला सुरुवातीपासूनच मृत किशोर कंगाले यांचा विरोध होता. त्यामुळं मृतक हे कोकणागड इथं राहून शेती सांभाळत होते.

मुलीच्या आंतरजातीय विवाहमुळे मुलगी आणि जावयाला संपत्ती आणि त्यांची कुठलीही मालमत्ता देणार नाही, असा संशय जावयाला निर्माण झाला होता. याच वादातून जावयानं सासऱ्याची हत्या करून त्यांचा मृतदेह शेतशिवारातील पुलाखालील पाईपमध्ये दडवून ठेवला.

किशोर कंगाले हे घरात दिसून आले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी पोलीसात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीनुसार, तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासाचा धागा किशोर कंगाले यांच्या जावयापर्यंत येऊन थांबला असता, पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणाचा छडा लावताना पोलिसांनी जावई अमित लांजेवारला नागपुरातून तर त्याचा मित्र योगेश पाठकला रामटेकमधून अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शहरात आचारसंहिता भंग करणाऱ्यावर पोलिसांनी केलेली कारवाई

पुण्यात मतदानाआधीच खळबळ उडवणारी घटना, अजित पवारांच्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यासाठी भाजप हायकोर्टात

खळबळजनक! लिंबू, काळी बाहुली, उमेदवाराचा फोटो...; नेरूळमध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराच्या गाडीखाली जादूटोण्याचा प्रकार

Mumbai Local: गुड न्यूज! हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवास होणार गारेगार; २६ जानेवारीपासून एसी लोकल धावणार; वाचा वेळापत्रक

Hirvya Mugachi Bhaji: अस्सल गावरान पद्धतीची हिरव्या मुगाची भाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT