Bangaluru Oyo Harini Murder Case Saam Tv News
क्राईम

Bengaluru Crime : यशस आता बास रे! OYO रुममध्ये दोघांचं वाजलं, प्रियकर चिडला; बेंगळुरुत दोन लेकरांच्या आईला का संपवलं?

Bangaluru Oyo Harini Murder Case : केंगेरी येथील रहिवासी असलेलं हे जोडपं एकमेकांना सुमारे वर्षभरापासून ओळखत होते. मयत महिलेचं नाव हरिणी आहे. तिचा प्रियकर असलेला आरोपी यशस हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.

Prashant Patil

बेंगळुरु : बेंगळुरु येथील OYO हॉटेलच्या रुममध्ये ३३ वर्षीय महिलेची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे तिच्या २५ वर्षीय प्रियकरानेच तिचा जीव घेतल्याचा आरोप आहे. ही घटना ६ जून रोजी रात्री उशिरा ओयो हॉटेलमध्ये घडली, परंतु सोमवारी महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर ती उघडकीस आली.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंगेरी येथील रहिवासी असलेलं हे जोडपं एकमेकांना सुमारे वर्षभरापासून ओळखत होते. मयत महिलेचं नाव हरिणी आहे. तिचा प्रियकर असलेला आरोपी यशस हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. हरिणी दोन लेकरांची आई होती. तिने यशसला अनैतिक संबंध संपवण्याचा हट्ट धरला होता. तिच्या या निर्णयामुळे गेल्या दोन महिन्यांत दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. मात्र ६ तारखेला ओयोच्या रुममध्ये झालेल्या वादाने टोक गाठलं आणि यशसने तिच्यावर सपासप वार केले.

दोघांमधील मैत्रीमुळे हरिणीच्या आयुष्यात वादळ निर्माण होत होते. ती दोन मुलांची आई होती. त्यातच हरिणीच्या कुटुंबाला या नात्याबद्दल माहिती मिळाल्याची बातमी आहे. ज्यामुळे तिच्या वैयक्तिक जीवनात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे तिने यशसला सांगितलं, 'की ती हे नातं पुढे चालू ठेवू शकत नाही.' यशसच्या मनात इतका राग भरला होता, की त्याच्याकडून हरिणीच्या अंगावर चाकूने तब्बल १७ वेळा वार करण्यात आले होते, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात गुन्हा दाखल करुन नंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

बंगळुरु दक्षिण येथील डीसीपी लोकेश बी जगलासर यांनी सांगितलं की, ही हत्या ६ आणि ७ जूनच्या मध्यरात्री घडली. 'सुब्रमण्यपुरा पोलीस ठाण्यात ६ आणि ७ जूनच्या मध्यरात्री एका हत्येची तक्रार दाखल करण्यात आली. महिलेला मैत्री संपवायची होती आणि ती त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती. परंतु राग आणि मत्सरातून तरुणाने महिलेवर चाकूने वार केले,' असे डीसीपींनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zubeen Garg: जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; प्रसिद्ध संगीतकाराला अटक, मॅनेजरच्या घरावरही छापेमारी

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

SCROLL FOR NEXT