A representative image highlighting concerns over women’s safety after a Bengaluru woman accused a delivery agent of misconduct inside her home. saam tv
क्राईम

क्रूर कृत्य! बाथरूमच्या बहाण्याने घरात घुसला; वॉशरूममधून बाहेर येताच महिलेसोबत अश्लील चाळे

Bengaluru Delivery Agent Harassment Case Details: बेंगळुरूमध्ये डिलिव्हरी एजंटने बाथरूमच्या बहाण्याने घरात जबरदस्तीने प्रवेश करून महिलेसमोर अश्लील वर्तन केल्याचा गंभीर आरोप. पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे.

Omkar Sonawane

बेंगळुरूमध्ये एका महिलेने डिलिव्हरी करणाऱ्या विरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. त्या डिलिव्हरी एजंटने तिच्या घरात जबरदस्तीने घुसून अश्लील कृत्य केल्याचा आरोप महिलेने केला आहे. सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर करताना महिलेने सांगितले की, पार्सल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी एजंटने तिच्याकडे बाथरूम वापरण्याची परवानगी मागितली. मात्र, तिने नकार दिल्यानंतरही तो जबरदस्तीने घरात शिरला.

मी त्याला नम्रपणे अनेकदा नकार दिला आणि स्पष्ट सांगितले की मी अनोळखी व्यक्तींना माझ्या फ्लॅटमध्ये येऊ देत नाही. तसेच, शेजारी पुरुष राहत असल्याने तिकडे जाऊन विचारण्याचा सल्लाही दिला. पण माझ्या वारंवार नकारानंतरही त्याने चप्पल काढली आणि जबरदस्तीने घरात प्रवेश केला, असे महिलेने पोस्टमध्ये लिहिले. महिलेच्या म्हणण्यानुसार, टॉयलेटमधून बाहेर आल्यानंतर त्या डिलिव्हरी एजंटने तिच्यासमोर अश्लील वर्तन केले. तो वॉशरूममधून बाहेर आल्यानंतर त्याने आपले खाजगी अवयव उघडे दाखवले. मी पूर्णपणे हादरले, अपमानित झाले आणि स्वतःच्या घरातही असुरक्षित वाटू लागले. एका महिलेने 'नाही' म्हटल्यानंतर त्याने तेथून जायला हवे होते. कोणालाही तिच्या मर्यादा ओलांडण्याचा किंवा जबरदस्तीने घरात घुसण्याचा अधिकार नाही, असे तिने म्हटले.

या घटनेनंतर आपण खूप घाबरल्याचेही महिलेने सांगितले. मी खूप घाबरले होते. मला असुरक्षित वाटू लागल्याने मी फोनचा कॅमेरा सुरू ठेवला, मुख्य दरवाजा उघडाच ठेवला आणि प्रवेशद्वाराजवळ उभी राहिले, जेणेकरून काही घडल्यास बाहेर पळता येईल. दररोज महिलांवरील अत्याचारांच्या घटना ऐकायला मिळतात, त्यामुळे आणखीनच भीती वाटू लागली असे ती पोस्टमध्ये म्हणाली. या घटनेमुळे आपण मानसिक धक्क्यात गेल्याचे आणि स्वतःच्या घरातही असुरक्षित वाटत असल्याचे महिलेने सांगितले.

दरम्यान, बेंगळुरू पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून संबंधित महिलेला अधिक माहिती देण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून आरोपांची पडताळणी करून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करता येईल. या घटनेचा अधिक तपास बेंगळूर पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarkari Yojana : मुलगी असेल तर सरकार देणार ₹25 हजारांची मदत; जाणून घ्या कन्या सुमंगला योजनेच्या अटी आणि अर्जाची प्रोसेस

Mumbai : मुंबईकरांची पाणी टंचाईची चिंता संपली! महत्त्वाच्या ७ धरणांमध्ये ९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा

Govinda: गोविंदा संतापला; कायदेशीर कारवाईचा कडक इशारा, अफवा पसरवणाऱ्यांना थेट १०० कोटींचा फटका

Bathroom Tips : बाथरूममधील पिवळे डाग कितीही घासले तरी जात नाहीत? हे घरगुती उपाय करतील मदत

NEET, TET नंतर महाराष्ट्रात आणखी एक पेपर फुटला, बहिणीसाठी शिक्षिकेनेच रचला कट

SCROLL FOR NEXT