Chandrasana Benefits: मानसिक तनाव फार वाढलाय? मग रोज सकाळी १० मिनिटं करा हे एक योगासन, आठवड्याभरात दिसेल फरक

Shruti Vilas Kadam

चंद्रासन

ताडासनात सरळ उभे राहा. दोन्ही हात डोक्यावर उचला. श्वास घेत शरीर ताठ ठेवा आणि श्वास सोडत हळूहळू एका बाजूला वाका. 15–30 सेकंद ही स्थिती कायम ठेवून पुन्हा सरळ या. त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही हीच कृती करा.

Chandrasana Benefits

मानसिक तणाव कमी होतो

चंद्रासन करताना श्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मन शांत राहते. तणाव, चिंता आणि मानसिक थकवा कमी होण्यास मदत होते.

Yoga | pinterest

पचनक्रिया सुधारण्यास मदत होते

या आसनामुळे पोटाच्या स्नायूंना हलका ताण मिळतो, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि गॅस, अपचन यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळते.

yoga | freepik

कंबर आणि मणक्याची लवचिकता वाढते

हे आसन मणक्याला आणि कंबरेला चांगला ताण देते. त्यामुळे शरीर अधिक लवचिक बनते आणि कडकपणा कमी होतो.

Chandrasana Benefits

पायांचे स्नायू मजबूत होतात

चंद्रासन करताना पायांवर शरीराचे वजन येत असल्याने मांडी, गुडघे आणि घोट्यांचे स्नायू बळकट होतात.

Chandrasana Benefits

शरीराची पोश्चर सुधारते

हे आसन नियमित केल्याने पाठीचा कणा सरळ राहण्यास मदत होते. त्यामुळे शरीराची ठेवण सुधारते आणि पाठदुखीचा धोका कमी होतो.

Chandrasana Benefits

एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो

चंद्रासनात संतुलन राखण्यासाठी पूर्ण लक्ष आवश्यक असते. त्यामुळे एकाग्रता, आत्मविश्वास आणि शरीरावरील नियंत्रण वाढण्यास मदत होते.

Chandrasana Benefits

Morning Breakfast Avoid: सकाळच्या नाश्त्याला चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

Morning Breakfast Avoid | Saam Tv
येथे क्लिक करा