Bengluru Crime Saam Tv
क्राईम

Shocking: आईस्क्रीमचे आमिष दाखवत आत खेचलं, बेकरीमध्येच ९ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

Bengluru Crime: बंगळुरूमध्ये धक्कादायक घटना घडली. ९ वर्षांच्या मुलीला आईस्क्रीमचे आमिष दाखवत बेकरी मालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून आरोपीला अटक करण्यात आली.

Priya More

बंगळुरूमध्ये ९ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरूमधील एमएस पल्या सर्कलजवळ सोमवारी रात्री ही घटना घडली. ३८ वर्षीय बेकरी मालकाने आईस्क्रीमचे आमिष दाखवून बेकरीमध्ये खेचले आणि तिच्यावर त्याच ठिकाणी लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे बंगळुरूमध्ये खळबळ उडली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी बेकरीतून आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी गेली असताना त्याने या मुलीला आतमध्ये ओढले आणि तिला कोपऱ्यात घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीच्या आईने तिला हाक मारली तेव्हा आरोपीने मुलीला सोडलं. मुलगी घाबरून बेकरीतून बाहेर पळत आली. आईने तिला काय झाले विचारले? असता तिने घडलेला प्रकार सांगितला. ही घटना सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

मुलीने तिच्या आईला सांगितल्यावर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. तिने आईला सांगितले की, त्याने मला बेकरीमध्ये बोलावले होते. तो माझ्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करू लागला. कुठेही हात लावून मला त्रास देऊ लागला. पीडित मुलगी आपल्या आईसोबत मेडिकल स्टोअरमध्ये गेली होती. तिची आई औषध खरेदी करण्यात व्यस्त असताना मुलीने आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी तिच्याकडे पैसे मागितले.

आईने पैसे दिल्यानंतर ही मुलगी जवळच्या बेकरीतून आईस्क्रीम आणण्यासाठी गेली. औषध खरेदी केल्यानंतर या मुलीच्या आईने तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. तिने मुलीला हाक मारली. तेव्हा ती मुलगी बेकरीतून धावत बाहेर आली. घटनेच्या वेळी आरोपी बेकरीमध्ये एकटा होता. या प्रकरणी मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गंत गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं! मालेगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे 'हे' हिल स्टेशन

Maharashtra Live Update: मनोज जरांगे पाटील यांना अचानक आली चक्कर

मतदान केलं त्यांनी निधी मागायचा नाही; मंत्री पंकजा मुंडेंची कुणाला तंबी?

Kishtwar Cloudburst: ६० जणांचा मृत्यू, २०० बेपत्ता; जेवणासाठी मोठी रांग, किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर भयावह वास्तव

लास्ट स्टेजमधील कॅन्सर बरा होऊ शकतो का?

SCROLL FOR NEXT