beed news bride run away with her biyfriend Saam Tv News
क्राईम

Beed News : बोहल्यावर चढली तरी बॉयफ्रेंडच्या आठवणीने व्याकूळ झाली, लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नववधू 'उडन छूsssss'

Beed Crime News : ९ मे रोजी लग्न लागल्यानंतर १० मे रोजी नवदाम्पत्यांनी जोडीने देवदर्शन केलं. त्या नंतर ११ मे रोजी नवरीला मुरळी पाठवून येती-जातीसाठी माहेरी नेण्यात आलं.

Prashant Patil

बीड : अंगाची ओली हळद सुकण्यापूर्वीच लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरी माहेरमधून प्रियकरासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ९ मे रोजी केज तालुक्यात एक विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला अनेकजण हजर होते. विवाह सोहळ्यानंतर उपस्थितांनी नवदाम्पत्यांना सुखी संसाराच्या शुभेच्छा दिल्या. पण, यावेळी वधूच्या मनात काही औरच होतं.

९ मे रोजी लग्न लागल्यानंतर १० मे रोजी नवदाम्पत्यांनी जोडीने देवदर्शन केलं. त्या नंतर ११ मे रोजी नवरीला मुरळी पाठवून येती-जातीसाठी माहेरी नेण्यात आलं. मात्र त्यानंतर तिने रात्री शौचाला जाण्याच्या बहाण्याने भावजाईचा मोबाईल घेतला आणि त्याद्वारे आपल्या शेजारच्या गावात राहणाऱ्या प्रियकराशी संपर्क साधला. त्यानंतर ती घरी येऊन झोपी गेली, आणि इतर नातेवाईक अंगणात झोपी गेले. त्यानंतर १२ मे रोजी तिच्या आईला घरातील लाईट बंद असल्याचं आढळून आल्यानं तिने घरात जाऊन पाहिलं असता ती आढळून आली नाही.

मुलीचा शोध घेतला असता ती कुठेच आढळून न आल्यानं ओली हळद अंगाला लागलेल्या नवरीच्या भावाने केज पोलीस ठाण्यात बहीण हरवल्याची तक्रार दिली आहे. प्रियकरासोबत पळून जाताना तिने नवऱ्याने लग्नात घातलेले झुंबर, मंगळसूत्र यासह एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड आणि मोबाईलसह पोबारा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअरपोर्टवरुन ३० नवीन शहरांसाठी फ्लाइट; नवीन वेळापत्रक जारी

Maharashtra Live News Update: अशोक खरात प्रकरणातील सर्व मंत्री-अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा, कुणी लिहलं राष्ट्रपतींना पत्र

Crime News: श्रद्धा वालकर हत्याकांडची पुनरावृत्ती; फ्रिजमध्ये सापडले मोनिकाच्या शरिराचे तुकडे, पोलीस शिराच्या शोधात

Shocking : नात्याला काळिमा! काकानं लेकीसारख्या मुलीवर केला बलात्कार, निर्जनस्थळी केलं अमानुष कृत्य

Home loan tips: होम लोन घेण्यापूर्वी या बाबींचा विचार नक्की करा

SCROLL FOR NEXT