Beed Crime  Saam Tv News
क्राईम

Beed Crime: बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! काठ्या अन् पाईपने महिला वकिलाला अमानुष मारहाण, सरपंचासह १० जणांचं धक्कादायक कृत्य

Female lawyer beaten by 10 men: बीडमध्ये महिला वकिलासह एका पुरूषाला पाईप आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोघे देखील जखमी झाले आहेत. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

बीडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. मारहाण, हत्या, अपरहण यासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या घटनेने बीड आधीच हादरले आहे. अशामध्ये बीडमध्ये पुन्हा एकदा गुंडाराजसारखी घटना समोर आली आहे. बीडच्या अंबाजोगाईमध्ये एका महिला वकिलाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे.

घरासमोरील गिरणी आणि लाऊड स्पीकर बंद करा यासंदर्भात महिला वकिलाने तक्रार केली होती. याचाच राग मनात धरून गावातील सरपंचासह १० पुरुषांनी हे धक्कादायक कृत्य केले. सेनगाव येथील महिला सरपंच आणि कार्यकर्त्यांकडून जेसीबीच्या पाईपने शेतामध्ये रिंगण करून वकिलाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा बीड हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील महिला सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून वकील महिलेला क्षुल्लक कारणावरून अमानुष मारहाण करण्यात आली आहे. ही महिला वकील अंबाजोगाई सत्र न्यायालयात कार्यरत आहे. महिला वकिलाने गावातील ध्वनिप्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा, लाऊडस्पीकर लाऊ नयेत, घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या.

तक्रार दिल्याचा राग आल्यामुळे गावातील महिला सरपंचाने आपल्या १० कार्यकर्त्यांच्या मदतीने वकिल महिलेला बेदम मारहाण केली. शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने या सर्वांनी महिला वकिलाला जबर मारहाण केली. मारहाणीदरम्यान महिला वकील बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला दवाखान्यात नेऊन एका रात्रीत उपचार करून घरी पाठवून दिलं. वकिल महिलेला मारहाण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stroke warning signs: स्ट्रोक येण्यापूर्वी तुमच्या शरीरात होतात 'हे' ६ बदल; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Viral Video: 'सरपंच खाली उतरला...', विद्यार्थ्यांनी अडवला रस्ता; चिखलफेक करत.. व्हिडिओ व्हायरल

Tejswini Pandit: दिलखुलास हसणारी...; आईच्या निधनानंतर लेक तेजस्विनी पंडीतची पहिली भावनिक पोस्ट

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात 14 मंडळात अतिवृष्टी, हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT