Crime News
Crime News Yandex
क्राईम

Beed Crime: धुलवडीची पार्टी बेतली जिवावर! शेततळ्यात ढकलून देत मित्रानेच मित्राला संपवलं; बीडमध्ये खळबळ

विनोद जिरे

Beed Crime News:

धूलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी शेतात पार्टी करायला गेलेल्या मित्रांमध्ये वाद झाल्याने वाद शेततळ्यात ढकलून देत खून केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या पवारवाडी येथे उघडकीस आला आहे. कुंडलिक भीमराव धुमाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News in Marathi)

नेमकं काय घडलं?

धूलिवंदनाच्या दिवशी सोमवार असल्याने अनेकांनी दुसऱ्या दिवशी पार्टी करण्याचे निश्चित केले होते. त्याप्रमाणे पवारवाडी येथील काही मित्रांनी मिळून अशोक खामकर यांच्या शेतात पार्टीचे आयोजन केले होते. दुपारी पार्टी करत असताना कुंडलिक भीमराव धुमाळ व संभा उर्फ महेश उत्तमराव मोरे यांच्यात बोलता बोलता वाद झाला.

यावेळी जवळच असलेल्या शेततळ्यात महेश मोरे याने कुंडलिकला तळ्यात ढकलून दिले. पाण्यात पडताच कुंडलीक घाबरला याचवेळी महेशने त्याच्या अंगावर उडी मारली. यामुळे पाण्यात खाली बुडून तोंडात व नाकात पाणी गेल्याने कुंडलिक याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान मित्रांनी अचानक पाण्यात बुडून कुंडलिकचा मृत्यू झाल्याचा बनाव केला. मात्र कुंडलिकला पोहता येत असल्याने त्याच्या कुटुंबियांनी बुडून मृत्यू होऊ शकत नाही, असा आक्षेप घेतला. यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता कुंडलिक याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी महेश मोरे यास अटक केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election: कुलाब्यात ठाकरे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा; नार्वेकरांना पाहून उबाठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Maharashtra Lok Sabha Voting Live: लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता विधानसभेच्या तयारीला लागा, शरद पवार गटाचं कार्यकर्त्यांना आवाहन

Ratnagiri News: रत्नागिरीत जगबुडी नदीत पाच जण बुडाले

Lok Sabha Election 2024 : राज्यात सर्वात कमी ४८.६६ टक्के मतदान तर या राज्यात झालं उच्चांकी मतदान; 7 वाजल्यानंतरही मतदान सुरू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला अल्टिमेटम; आरक्षण दिलं नाही तर या तारखेला उग्र आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT