Beed crime news Saam Tv News
क्राईम

Beed Crime : चोरांचं संतापजनक कृत्य, महिलेच्या कानातले ओरबाडले, झटका बसल्यानं कान फाटला; बीडमध्ये खळबळ

Beed Crime News : बीड बसस्थानकात रात्रीच्या सुमारास चोरट्यांकडून एका वृद्ध महिलेच्या कानातील सोने हिसकावून घेताना चक्क कानाचा खालच भाग फाटल्याने महिला जखमी झाली आहे. नागाबाई मंजुळे (वय ६०) असं महिलेचं नाव आहे.

Prashant Patil

योगेश काशिद, साम टिव्ही

बीड : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या आणि सततच्या गुन्हेगारी घटनांमुळे बदनाम झालेल्या बीड जिल्ह्यातून आणखी एक भयंकर घटना समोर आली आहे. बीड बसस्थानकात रात्रीच्या सुमारास चोरट्यांकडून एका वृद्ध महिलेच्या कानातील सोने हिसकावून घेताना चक्क कानाचा खालच भाग फाटल्याने महिला जखमी झाली आहे. नागाबाई मंजुळे (वय ६०) असं महिलेचं नाव आहे. चोरी, लुटमार आणि पाकीटमारीचे प्रकार वाढल्यामुळे बस स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी बसस्थानकात एकाच दिवशी दोन वृद्धांचे सोने लुटल्याचा प्रकार घडला होता. आता नव्याने हा प्रकार उघडकीस आल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

या घटनेमुळे चोरटे आणि पोलीस यांच्यात मिलीभगत असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये रंगली आहे. काल शुक्रवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली. नागाबाई मंजुळे या बसने मेहकरहून लातूरला निघाल्या होत्या. त्या बीडच्या बसस्थानकात नैसर्गिक विधीसाठी उतरल्या होत्या. स्वच्छतागृहाकडे जात असताना चोरट्यांनी त्यांच्या कानातले ओरबाडून पळवले. या घटनेवेळी चोरट्यांनी नागाबाई मंजुळे यांच्या कानातील सोन्याचे झुंबर जोरदार झटका देऊन पळवले. या जोरदार झटक्यामुळे नागाबाई मंजुळे यांच्या कानाचा खालचा भाग फाटला आणि रक्तस्राव होऊ लागला. अचानक घडलेल्या या घटनेमुळं नागाबाई मंजुळे यांना मोठा मानसिक धक्का बसला. आजुबाजूचे नागरिक त्यांची विचारपूस करत होते. मात्र, भांबावून गेलेल्या नागाबाई मंजुळे यांना उत्तरही देता येत नव्हतं. या घटनेमुळे बसस्थानकावरील नागरिक देखील घाबरले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT