Chhatrapati Sambhajinagar 
क्राईम

Crime : तू कॉलर का उडवतो? BCS च्या विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या, संभाजीनगर हादरले

Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये १९ वर्षीय विद्यार्थ्याची निर्घूण हत्या केली आहे. फ्लॅटमध्ये एकटाच असल्याचा डाव साधत अज्ञात तरूणांनी त्याचा गळा चिरला. तो बीडमधील माजलगावचा मूळचा आहे.

माधव सावरगावे, औरंगाबाद

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये १९ वर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. हत्येचं नेमकं कारण अद्याप समजले नाही. प्रथामिक तपासानुसार, कॉलेजमध्ये झालेल्या किरकोळ कारणामुळे विद्यार्थ्याची हत्या केल्याचा अंदाज बांधला जातोय. प्रदीप विश्वनाथ निपटे असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे, तो बीडमधील माजलगावचा असल्याचे समजतेय. तो फ्लॅटमध्ये राहत होता, अज्ञात तरूणांनी त्याचा खून केल्याचे समोर आलेय.

छत्रपती संभाजीनगर शहरात एका बीसीएसच्या विद्यार्थ्याची फ्लॅटमध्ये गळा चिरून हत्या केल्याची घटना घडलीय. १९ वर्षीय प्रदीप विश्वनाथ निपटे या विद्यार्थ्यांची अज्ञातांनी निघृण हत्या केली. प्रदीपच्या हत्येला कॉलेजमध्ये झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा प्राथमिक संशय आहे. शनिवारी महाविद्यालयातील मुलांची आणि प्रदीपच्या मित्रांची एकटक का पाहतो, तू कॉलर का उडवतो, अशा किरकोळ कारणांवरून वाद होऊन हाणामारी झाली होती. त्यामुळेच त्याचा काटा काढल्याचे बोलले जातेय.

संक्रांतीच्या दिवशी रात्री मित्र बाहेर गेलेले असताना मारेकऱ्यांनी फ्लॅटवर जात प्रदिपचा गळा चिरून मारून टाकले. मंगळवारी रात्री ११.३० वाजता उस्मानपुऱ्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मूळ माजलगावचा असलेला प्रदीप देवगिरी महाविद्यालयात बीसीएसच्या प्रथम वर्षात शिकत होता.

एक मावसभाऊ व अन्य तीन मित्र, असे सोबत भाजीवालीबाई पुतळ्याजवळील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅटमध्ये रेंटवर राहत होते. मंगळवारी महाविद्यालयातून सर्वजण परतले. सायंकाळी त्याचा भाऊ व अन्य मित्र बाहेर गेले होते. प्रदीप मात्र एकटाच फ्लॅटवर थांबला होता. रात्री १० वाजता ते खोलीवर परतले. तेव्हा प्रदीप गळा कापलेल्या रक्तबंबाळ मृतावस्थेतच दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT