Mahalakshmi Case Saam TV
क्राईम

Mahalakshmi Case : महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा; पत्नीच्या मारेकऱ्याचं थेट नावचं घेतलं

Ruchika Jadhav

बेंगळुरूमध्ये क्रूर नराधमाने सर्व गोष्टींची सीमा ओलांडून २९ वर्षीय महिलेची निघृण हत्या केली तसेच महिलेच्या शरीराचे ४० तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेवले होते. घडलेल्या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू असताना आता या केसमध्ये एक ट्वीस्ट आला आहे. महिलेच्या पतीने पोलिसांना आरोपी बद्दल माहिती देत धक्कादायक दावा केला आहे.

महिलेच्या हत्येबद्दल तिच्या पतीने म्हणजे हेमंतने काही गोष्टींचा खुलासा केला आहे. हेमंतने सांगितले आहे की, माझ्या बायकोचे प्रियकर अश्ररफसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेर होते. अश्ररफनेच महालक्ष्मीचा खून केला असावा असा मला संशय आहे, असं हेमंतने पोलिसांना सांगितलं आहे.

महालक्ष्मीचा नवरा हेमंत मोबाईलच्या दुकानात काम करतो. या दोघांचे ६ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. हेमंत आणि महालक्ष्मीला एक मुलगी सुद्धा आहे. मात्र, घरच्या काही वादविवादामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वादविवादावरुन हेमंत आणि महालक्ष्मी ९महिन्यापूर्वी वेगळे झाले होते.

हेमंत महालक्ष्मीला २५ ते ३० दिवसांपूर्वीची शेवटचा भेटला होता. शेवटची भेट तो ज्या मोबाईल दुकानात काम करतो तेथेच झाली होती, असंही हेमंतने पोलिसांना सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्ररफ उत्तराखंडमध्ये राहणारा आहे. अश्ररफविषयी हेमंतने काही महिन्यांआधी बेंगळुरूमधील नेलमंगला पोलिस्टेशनमध्ये तक्रार केली होती. त्या तक्रारीवर अश्ररफला कडक कारवाई देऊन अनेक सूचना मिळाल्या होत्या. अश्ररफच्या या तक्रारीवर तो पुन्हा बेंगळुरूमध्ये येणार नाही असे सांगितले गेले होते. यावरून अश्ररफनेच महालक्ष्मीची हत्या केल्याचा आरोप हेमंतने केला आहे.

महालक्ष्मीच्या पतीला २०२३ साली एप्रिल किंवा मे महिन्यात त्याच्या पत्नीच्या एक्स्ट्रा मेरिटल अफेरबद्दल समजले होते. महालक्ष्मीने कधीच पतीला तिच्या अफेरबद्दल सांगितले नव्हते. पण हेंमतला आधीच या सर्व गोष्टींची कल्पना होती. आरोपी अश्रफ हा एका सलूनमध्ये काम करतो. या दोघांच्या नात्याबद्दल समजताच हेमंतने अश्ररफविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.

फ्लॅटमधून महालक्ष्मीचा मृतदेह बाहेर काढला

पोलिसांना या सर्व घटनेची माहिती मिळताच त्यांनी २१ सप्टेंबर रोजी महालक्ष्मीचा मृतदेह बाहेर काढला. महालक्ष्मीचा मृतदेह पोलिसांना व्यालिकावल भागात एका फ्लॅट रुममध्ये मिळाला होता. तिच्या मृतदेहाचे ४० तुकडे करून सर्व तुकडे फ्रिजमध्ये भरून ठेवले होते. तीन दिवस रूम बंद होता त्यामुळे घराचा वास येऊ लागला.

त्यामुळे पोलिसांनी येथे पहाणी करताच भयंकर दृष्य डोळ्यांसमोर उभं राहिलं. पोलिसांनी महालक्ष्मीच्या मृतदेहाला घटनास्थळी जावून ताब्यात घेतले. या घटनेत महालक्ष्मीच्या शरीराचे चाळीस तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवले होते. पोलिसांनी तिचे शव ताब्यात घेतले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: समाजाच्या विनंतीला मान देऊन धनगर उपोषणकर्त्यांचे १६व्या दिवशी आंदोलन स्थगित

Pulwama Attack : पुलवामा हल्ल्यातील आरोपीचा अचानक मृत्यू; आतकंवाद्यांना घरात दिला होता आश्रय

Maharashtra Politics: दादांच्या एक्झिटसाठी भाजप-सेनेचा प्लॅन? विधानसभेत अजित पवारांना एकटं लढावं लागणार? वाचा...

Jalna News : जरांगेंच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती आली समोर

India : देशातील 5 सर्वात उंच इमारती माहिती आहेत? आकाश वाटेल ठेंगणे

SCROLL FOR NEXT