Assam Crime News ANI
क्राईम

Assam Crime News: अरे बापरे! इंजिनियरच्या घरात सापडलं लाखोंचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारी बुचकळ्यात, काय आहे प्रकरण?

Rohini Gudaghe

गुवाहाटीमध्ये (Assam Crime News) एका कार्यकारी अभियंत्याच्या घरात पैशांचं मोठं घबाड सापडलं आहे. या इंजिनीयरच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने छापा टाकला होता. या छाप्यादरम्यान त्यांना या अभियंत्याच्या घरातून नोटांचे बंडल सापडले आहेत. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, हेंगराबारी येथील पीएचईच्या कार्यकारी इंजिनियरच्या घरातून लाखो रुपये जप्त करण्यात आले आहेत.

या इंजिनियरचं नाव जयंत गोस्वामी असल्याची माहिती इंडिया टीव्हीच्या हवाल्यानुसार मिळत आहे. इंजिनियरच्या घराच्या झडतीदरम्यान आसामच्या दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाच्या (Cash Recovered From Engineer House) पथकाने ७९ लाख रुपयांहून अधिक रोकड जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जयंत गोस्वामी याच्या घरातून ७९ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

जयंत गोस्वामी सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या उत्तर लखीमपूर विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १३ मे रोजी दुपारी जयंत गोस्वामीला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक (Crime News) केली आहे. गोस्वामी गुवाहाटी येथील हंगराबारी येथील धृती प्रवा हॉटेलमध्ये २० हजार रुपयांची लाच घेत होता. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला पथकाने रंगेहाथ पकडल्याची माहिती मिळतेय.

जयंत गोस्वामीला (Guwahati) लाच घेत असताना अटक करण्यात आली. त्यानंतर पथकाने वेळ न दवडता हंगेराबादी येथील जयंत गोस्वामी याच्या निवासस्थानावर छापा टाकला. तातडीने शोध मोहीम सुरू केली. या कारवाईदरम्यान पथकाने इंजिनियरच्या घरातून एकूण ७९ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. इंजिनियरच्या घरातुन एवढी मोठी रक्कम जप्त केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या अभियंत्यावर संबंधित विभाग पुढील कारवाई करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT